नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी सर्वत्र प्रचंड गाजत आहेत. या चित्रपटाला प्रदर्शित तीन आठवडे लोटले. मात्र अजूनही या चित्रपटाची हवा प्रेक्षकांमध्ये आहे. सोशल मीडियावर तर या चित्रपटातील अनेक प्रसंगाचे मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक ठिकाणी तर डब स्मॅशही केले जातायत.
सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. चित्रपटात लंगड्या जेव्हा परश्याला आर्ची आली रे अशी हाक मारतो त्यावेळचा प्रसंग तीन लहान मुलांनी सादर केलाय. हा व्हिडिओ पाहताना नक्कीच तुम्हाला हसू आवरणार नाही.

Story img Loader