प्रेमपटांचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश राजवाडे यांचा आणखी एक प्रेमपट बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेमापेक्षा नातं महत्त्वाचं.. कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं.. ते कायम असतं, अशी काहीशी भावभावना व्यक्त करत येणारी सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमकथा म्हणजे ‘ऑटोग्राफ’ हा त्यांचा आगामी चित्रपट. हा चित्रपट पहिल्यांदाच चित्रपटगृहात प्रदर्शित न करता थेट ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. रविवार, १४ मे रोजी दुपारी १ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाचा प्रीमिअर करण्यात येणार आहे. केवळ दूरचित्रवाहिनीसाठी याआधी अनेकदा चित्रपट करून ते प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र नावाजलेले कलाकार घेऊन मोठय़ा निर्मितीखर्चात केलेला आणि चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने केलेला चित्रपट थेट दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित करण्याचा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या या अनोख्या प्रयोगामागचा विचार दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते संजय छाब्रिया यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केला. सतीश ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुखही आहेत. शिवाय, या वाहिनीने ‘प्रवाह पिक्चर’ ही मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र वाहिनी सुरू केली आहे आणि तरीही ‘ऑटोग्राफ’ हा चित्रपट ‘स्टार प्रवाह’ या मनोरंजन वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे.  ‘आपण जो चित्रपट करतो तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा असते. ‘स्टार प्रवाह’चा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा जो आलेख आहे तो सातत्याने चढता राहिला आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील मालिकांच्या माध्यमातून हे यश साध्य झालं आहे, मग अशावेळी ‘ऑटोग्राफ’सारखा बहुकलाकार, मोठय़ा निर्मितीखर्चाचा चित्रपट जर या वाहिनीवर प्रदर्शित झाला.. जो एकाच दिवशी, एकाच वेळेला महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे स्टार प्रवाह वाहिनी पोहोचलेली आहे तिथे या चित्रपटाचा प्रीमिअर करत तो पोहोचला तर काय होऊ शकेल असा एक प्रयोग वाहिनीला करावासा वाटला. आणि त्यासाठी वाहिनीने ‘ऑटोग्राफ’सारख्या नव्याकोऱ्या आणि भव्य चित्रपटाची निवड केली’, असे सतीश राजवाडे यांनी सांगितले. ‘स्टार प्रवाह’ ही वाहिनी सध्या साडेचार कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, इतक्या मोठय़ा प्रेक्षकसंख्येला जर काही वेगळं, नवीन द्यायचं असेल तर आधीच प्रदर्शित झालेला चित्रपट दाखवणं असा प्रकार न करता वाहिनीने या प्रयोगासाठीही विचारपूर्वक चित्रपटाची निवड केली आहे. दूरचित्रवाहिनी आणि ‘स्टार प्रवाह’ची ताकद इतकी अफाट आहे की एकाच वेळी एक कलाकृती आपण इतक्या मोठय़ा संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो तर यासारखा दुसरा आनंद नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक आणि पूर्ण विचारानिशी ‘ऑटोग्राफ’ हा चित्रपट स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, असं सतीश राजवाड़े यांनी स्पष्ट केलं.

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
star pravah lagnachi bedi serial will off air
‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…

या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. एक कलाकार म्हणून तुमचा इतका मोठा चित्रपट चित्रपटगृहात न येता दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होतो आहे, याबद्दल त्याला काय वाटतं? हा प्रश्न विचारला असता समोर दहा लोक असोत वा खूप जण असोत त्यांच्यापर्यंत तो चित्रपट पोहोचणं, त्यांनी तो बघणं हे कलाकाराला अधिक महत्त्वाचं वाटतं, असं अंकुशने सांगितलं. हल्ली प्रेक्षक क्रिकेट सामने पाहण्यासाठीही चित्रपटगृहात वा अन्य ठिकाणी गर्दी करतात. कलाकार म्हणून हे बदल स्वीकारले पाहिजेत, असंही मत त्याने व्यक्त केलं. ‘सिनेमा बनवत असताना तो कधीच छोटय़ा पडद्यासाठी की मोठय़ा पडद्यासाठी असा विचार केला जात नाही. चित्रपटगृहात गर्दी करणारा प्रेक्षकच घरी एकत्र बसून हा चित्रपट पाहणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेले आणि यशस्वी ठरलेले हिंदी चित्रपट नंतर चित्रपटगृहातून प्रदर्शित केले गेले आहेत. त्यामुळे असे प्रयोग सातत्याने सुरू असतात. आम्हीही हा प्रयोग करून पाहतो आहोत’, असे सांगतानाच ‘ऑटोग्राफ’ हा चित्रपट दूरचित्रवाहिनीवरील प्रीमिअरनंतर चित्रपटगृहातूनही प्रदर्शित केला जाऊ शकतो, अशी शक्यताही सतीश यांनी बोलून दाखवली.