प्रेमपटांचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश राजवाडे यांचा आणखी एक प्रेमपट बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेमापेक्षा नातं महत्त्वाचं.. कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं.. ते कायम असतं, अशी काहीशी भावभावना व्यक्त करत येणारी सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमकथा म्हणजे ‘ऑटोग्राफ’ हा त्यांचा आगामी चित्रपट. हा चित्रपट पहिल्यांदाच चित्रपटगृहात प्रदर्शित न करता थेट ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. रविवार, १४ मे रोजी दुपारी १ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाचा प्रीमिअर करण्यात येणार आहे. केवळ दूरचित्रवाहिनीसाठी याआधी अनेकदा चित्रपट करून ते प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र नावाजलेले कलाकार घेऊन मोठय़ा निर्मितीखर्चात केलेला आणि चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने केलेला चित्रपट थेट दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित करण्याचा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा