काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतायत. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरही होतेय. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेनं तिच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला होता. तसेच निशा रावलनंही तिच्या घटस्फोटाबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एका महिला सदस्यानं अभिनेता करणवीर बोहराबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लॉक अप’च्या नव्या एपोसोडमध्ये सदस्य अंजली अरोरा मुनव्वर फारुखीसोबत बोलताना दिसत आहे. मुनव्वरशी बोलताना तिनं करणवीर बोहराबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. करणवीर बोहरानं तिला शोमध्ये लव्ह अँगल खेळण्यासाठी रिलेशनशिपची ऑफर दिली असल्याचं तिनं मुनव्वरला सांगितलं.

आणखी वाचा- ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार नाहीत नवज्योत सिंह सिद्धू, काय आहे कारण?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अंजली अरोरानं मुनव्वरला म्हटलं, ‘करणवीर त्याच्या पत्नीचा फोटो घेऊन माझ्याकडे आला होता आणि त्यानं मला सांगितलं, ‘या गेममध्ये ही तू आहेस आणि हा मी आहे’ त्याचं बोलणं मला समजलंच नाही.’ यानंतर पुढे काय झालं असं मुनव्वरनं विचारताच अंजली म्हणाली, ‘करण मला या शोमध्ये लव्ह अँगलच्या रिलेशनशिपसाठी विचारत होता.’

आणखी वाचा- The Kashmir Files प्रमोशन वादावर कपिल शर्माचं स्पष्टीकरण; म्हणाला “त्यांनी केलेले आरोप…”

अंजलीचं बोलणं ऐकून मुनव्वरला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. तू हे खरंच सांगत आहेस का? असं तो तिला विचारतो. त्यावर अंजली म्हणते, ‘त्यानं मला सांगितलं की, शोमध्ये या अशाच गोष्टी चालतात. माझं वय तर आता जास्त आहे. पण तू तरुण आहेस. जर तुला मी आवडू लागलो तर हे पाहणं लोकांनाही आवडेल. त्यासाठी तुला प्रेक्षकांना हे दाखवून द्यावं लागेल की तू माझ्या प्रेमात आहेस.’ अंजली मुनव्वरला ही गोष्ट सीक्रेट ठेवण्यास सांगताना दिसली.