एकता कपूरचा ‘लॉक अप’ रिअॅलिटी शो हा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कंगना रणौत हा शो होस्ट करत आहे. काल २७ फेब्रुवारीपासून हा रिअॅलिटी शो डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. नुकतंच या लॉक अप रिअॅलिटी शो मध्ये कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काल ‘लॉक अप’ या रिअॅलिटी या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला. यावेळी कंगनाने बॉलिवूडमधील अनेक कलाकारंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. यावेळी तिने हृतिक रोशनचीही खिल्ली उडवली. कंगना आणि हृतिक यांच्यात आतापर्यंत अनेकदा शाब्दिक वाद झाले आहे. कंगनाने २०१६ मध्ये एका मुलाखतीदरम्यान हृतिकचे नाव न घेता त्याला एक्स बॉयफ्रेंड असे म्हटले होते. त्यावेळी कंगनाने ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता ‘लॉक अप’ रिअॅलिटी शो च्या प्रीमियरवेळी कंगनाने पुन्हा एकदा हृतिकवर निशाणा साधला आहे.

यावेळी कंगना म्हणाली, “मी रिअॅलिटी शो करते हे पाहून बाहेरचे सर्व जग हादरले आहे. कोणाकोणाच्या गोष्टी उघड होणार, याचा विचार करुन लोकांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांचे हात पाय थरथरत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून जे माझ्याशी बोललेले नाहीत, अशा लोकांकडून मला कॉल येत आहे. अनेकजण भेटवस्तू पाठवत आहे.”

“आता कंगनाला पटवून ठेवावे लागले जेणेकरुन ती आत जाऊन आमच्या गोष्टी उघड करु नये. अनेक जण हाताची पाचही बोट जोडत आहे. तर सहा बोटे असलेल्यांचाही घसा कोरडा पडला आहे. पण अजून त्यांनी हात जोडलेले नाही. पण आता जे होईल ते होईल. आणि यापुढे जे काही होईल ते पाहता येईल. कारण आता हात जोडा किंवा पाय.. आता जे मला पाहिजे ते होणार”, असेही कंगना यावेळी म्हणाली. यावेळी कंगनाने हावभावांमध्ये माफी न मागितल्याबद्दल हृतिकला टोमणाही मारला.

‘आमच्या घरी १२ महिने…’, लेकीचा हटके व्हिडीओ पोस्ट करत सोनाली कुलकर्णीने दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा

कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी ‘लॉक अप’मध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे.