बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतात. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरही होतेय. काही दिवसांपूर्वीच निशा रावलनंही तिच्या घटस्फोटाबाबत काही खुलासे केले होते. तर आता निशाने विवाहीत असतानाही ती परपुरुषाकडे आकर्षित झाली असून त्या परपुरुषाला किस केलं होतं.
निशाला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी स्वतःविषयी असलेलं एक डार्क सिक्रेट सांगायचं होतं. तेव्हा निशा म्हणाली, “मी २०१२ मध्ये माझ्या पूर्वाश्रमीचा पती करण मेहरासोबत लग्न केले. त्यानंतर २०१४ मध्ये माझा गर्भपात झाला याविषयी अनेकांना माहिती आहे. माझा गर्भपात झाला तेव्हा माझे बाळं ५ महिन्यांचे होते. अनेकांना हे देखील माहीत आहे की, मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अब्यूजिव (Abusive) रिलेशनशिपमध्ये होते. अशा परिस्थितीत गर्भपात हा माझ्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. एक स्त्री म्हणून मी त्यावेळी अनेक समस्यांचा सामना करत होते. त्यावेळी माझ्यावरही अनेकदा अत्याचार झाले. पब्लिक फिगर असल्याने मी ते कोणाशीही शेअर करू शकले नाही. मला भीती होती की माझे मित्र आणि मी ज्या समाजात राहते तिथे माझ्याविषयी निरनिराळी मतं तयार करतील. अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबाचा विचार करता, मला त्यावेळी कोणी पाठिंबा देत नव्हतं.”
आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी काजोल होणार तिसऱ्या बाळाची आई? या VIRAL VIDEO वरून चर्चा
आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…
निशा रावल पुढे म्हणाली, “ही २०१५ ची गोष्ट आहे. माझ्या चुलत भावाचा संगीत समारंभ होता. माझ्यासोबत शारीरिक शोषणाची मोठी घटना घडली आणि मी पूर्णपणे हादरले होते. मला कोणाला तरी याविषयी सांगायचे होते, मला थेरपी घ्यायची होती. त्यावेळी आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट होत होतो. तिथे मला एक जुना मित्र भेटला. आम्ही खूप दिवसांनी भेटलो. माझा त्याच्यावर विश्वास होता. माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला माहित होते की मी त्याला वेळोवेळी भेटत आहे. मी खरोखर त्या मित्राच्या जवळ आली होती. मी त्याच्याकडे आकर्षित झाली होती. कारण मला त्याच्याकडून आधार मिळत असल्याची जाणीव होत होती. अशा काळात तुम्हाला जेव्हा एखादा आधार मिळतो, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची इच्छा होते. याच दरम्यान मी त्याला किसं केलं. मी माझ्या पूर्वीश्रमीच्या पतीला हे सांगितलं होतं. या आधीच आम्ही विभक्त होण्यावर बोलत होतो. या घटनेनंतर मला वाटले की मी आमच्या नात्यातून बाहेर पडलं पाहिजे. मला याची खात्री होती की मला या नात्यात राहायचे नाही आणि आम्ही विभक्त झालं पाहिजे. तो माझ्यासाठी कठीण काळ होता.”
निशा शेवटी म्हणाली, “इतकं होऊनही मी माझ्या लग्नाला आणखी एक संधी दिली, कारण मला वचन दिलं होतं की, शिवीगाळ पुन्हा होणार नाही. मी त्या मैत्राशी संबंध सोडून माझ्या लग्नावर लक्ष केंद्रित केले. मात्र ते वचन तर खोटं ठरलं. मग अखेर गेल्या वर्षी मी स्वतःसाठी उभी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.” त्यानंतर कंगनाने निशाला सांगितले की, “तिला फक्त आशा आहे की निशाला भविष्यात पुन्हा प्रेम आणि चांगला जोडीदार मिळेल.”