कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो मागच्या काही काळापासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलिकडेच या शोमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीनं ती आयुष्यात कधीच आई होऊ शकणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. पायल रोहतगी संग्राम सिंहसोबतचं तिचं नातं आणि कधीच आई होऊ न शकण्याच्या आपल्या समस्येबद्दल बोलताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तिनं संग्रामला जी मुलगी त्याला मुल देऊ शकते अशा मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता असंही सांगितलं होतं. त्यानंतर यावर पायलचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहची देखील प्रतिक्रिया आली होती. ‘काहीही झालं तरीही मी पायलशीच लग्न करणार आणि आमच्या आयुष्यात ज्या गोष्टीची उणीव आहे ती आम्ही प्रेमाने भरुन काढू’ असं त्यांनं सांगितलं होतं.

आता पायलनं आणखी खुलासा केला आहे. पायलनं सरोगसी किंवा मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण यातही तिला समस्या येत आहेत. याचा खुलासा तिने सायशा आणि अंजली यांच्या बोलताना केला आहे. पायलनं सांगितलं की मागच्या १२ वर्षांपासून लग्न करण्यासाठी आतुर झालेली आहे. मात्र या एका कारणामुळे तिने नेहमीच लग्न करणं टाळलं आहे. पायल म्हणाली, ‘संग्रामनं एकदा मला सांगितलं तर मला तुझ्यासारखं बाळ हवं आहे. पण मी त्याला असं बाळ देऊ शकत नाही कारण मी कधीच आई होऊ शकत नाही.’

आणखी वाचा- दिशा पाटनीनं केली लिप्स सर्जरी? टायगरच्या Heropanti 2 पेक्षा गर्लफ्रेंडचीच चर्चा

पायलनं पुढे सांगितलं की ती आता एक मुल दत्तक घेणार आहे किंवा मग सरोगसीची मदत घेणार आहे. ती म्हणाली, ‘मी बाळाला दत्तक घेऊ इच्छिते पण त्यासाठी मला प्रमाणपत्र हवं. डॉक्टर सांगतात तुमचं लग्न झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र घेऊन या. त्यांनी सांगितलं की लिव्ह इन चालणार नाही लग्नाचं प्रमाणपत्र हवं. त्यासाठी आता आम्हाला लग्न करून ऑन रेकॉर्ड प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.’ पायलचं बोलणं ऐकल्यानंतर अंजली आणि सायशा तिला सरोगसी किंवा बाळ दत्तक घेण्यासाठी मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

आणखी वाचा- राधिका आपटेचा व्हिडीओ चर्चेत, अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते हैराण

नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पायल रोहतगीनं कॅमेरासमोर तिचं सीक्रेट सांगतानाच २० वर्षांच्या मुलींसाठी एक सल्ला देखील दिला आहे. तिनं मुलींना एग फ्रिज करण्यास सांगितलं आहे. जेणेकरून जर करिअरमध्ये बिझी असताना लग्न आणि प्रेग्नन्सी या गोष्टींना उशीर झाला तर वयाच्या ४० व्या वर्षी देखील त्या आई होऊ शकतील.

Story img Loader