बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या लॉक अप शोमुळे चर्चेत आहे. हा शो सुरु झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये असलेली अभिनेत्री पूनम पांडे ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पूनमने चाहत्यांना वचन दिले होते की जर त्यांनी तिला जास्त व्होट देत वाचवलं तर ती कॅमेऱ्यासमोर टी-शर्ट काढेल. हे समजल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर लॉकअपमध्ये असलेल्या इतर स्पर्धकांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. आता पूनमने असे काही केले की सगळ्यांना आश्चर्य वाटले आहे.
पूनमने तिच्या चाहत्यांना वचन दिले होते की जर त्यांनी तिला वाचवले तर ती कॅमेऱ्यासमोर तिचा टी-शर्ट काढेल. आता तिने दिलेले वचन पूर्ण केले आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिने लाइव्ह कॅमेऱ्यासमोर तिचा टी-शर्ट काढला. हे पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. पूनमने याआधीही एकदा कपडे काढण्यावर बोलली होती. पूनम पांडेने २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान एक वक्तव्य केले होते. त्यावेळी भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका येथे झालेल्या विश्वचषकात भारताने अंतिम सामना जिंकला होता. भारतीय क्रिकेट संघाला चिअर करताना पूनम पांडे म्हणाली की, “जर भारतीय क्रिकेटपटूंनी वर्ल्डकप आणला तर ते न्यूड होणार.”