काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा शो प्रदर्शित झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. या शोमधील स्पर्धक लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतात. काही दिवसांपासून या शोमध्ये असलेली स्पर्धक सायशा शिंदे चर्चेत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये सायशाने कॉमेडिय मुनव्वर फारुकी विषयी असलेल्या तिच्या भावना सारा खानला सांगितल्या आहेत.
तिच्या भावनांविषयी सांगतना सायशा साराला म्हणाली, “मला माहित नाही पण मुनव्वरबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नल आहे. मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतं की जर मी त्याचा विचार करत कोणते निर्णय घेतले तर त्यात माझी चूक नाही. कारण मला माहीत आहे की हे फक्त एक तरफी असणार आहे.”
आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत
यावर साराने सायशाला विचारले की “मुनव्वरला तिच्या भावनांविषयी माहित आहे का?” यावर नाही असं उत्तर देत सायशा म्हणाली, “नाही, कोणालाही माहित नाही आणि ही गोष्ट कोणाला कळता कामा नये.”
सायशा शिंदे ही मूळची महाराष्ट्रातील असून तिचं पूर्वीच नाव स्वप्नील असं होतं. ती एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यामुळे तिला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. लॉकअपमध्ये पूनम पांडेसोबत बोलत असताना सायशानं आपला कटू अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “या नात्यात माझ्यावर शारिरीक नाही तर मानसिक अत्याचार झाले होते. हे खूपच वाईट होतं. तो मला खूप चुकीच्या पद्धतीने वागवत असे. जसं की मी कोणीतरी घाणेरडी व्यक्ती आहे.”