कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप’ सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमधून आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अलिकडे मुनव्वर फारुखी आणि कंगना रणौत यांनी त्याच्या बालपणी झालेल्या लैंगिक शोषणाबाबतचा खुलासा या शोमध्ये केला होता. त्यांचे हे अनुभव ऐकल्यानंतर या शोची सदस्य सायशा शिंदेलाही अश्रू अनावर झाले. तिनेही यावेळी तिला आलेला लैंगिक शोषणाचा अनुभव शेअर केला. एवढंच नाही तर केवळ ट्रान्सजेंडर असल्यानं आपल्यासोबत अशा घटना घडल्याचं धक्कादायक वक्तव्यही तिनं केलं.

कंगना रणौत आणि मुनव्वर फारुखी यांचे अनुभव ऐकल्यानंतर सायशा म्हणाली, “हे माझं सर्वात पहिलं सीक्रेट होतं. तुमच्या दोघांचे अनुभव ऐकल्यानंतर मला माझा अनुभव देखील आठवला. माझ्यासोबत जेव्हा हे सर्व घडलं होतं तेव्हा काही लोकांशी मी या गोष्टी शेअर केल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं, “तू सेक्समध्ये सहभागी आहेस आणि तू ‘गे’ आहेस म्हणून तुझ्यासोबत अशा घटना घडत आहेत.” लोकांचं असं बोलणं ऐकल्यानंतर परत कोणाशी काही शेअर करायची माझी कधीच हिंमत झाली नाही.”

आणखी वाचा- सचिन तेंडुलकरची लेक लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण? चर्चांना उधाण

सायशा शिंदेनं शोच्या सुरुवातीलाच तिचा स्वप्नील शिंदे ते सायशा शिंदे हा प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर केला होता. बराच काळ मानसिक तणाव, लोकांची बोलणी ऐकल्यानंतर कशाप्रकारे तिने सायशा होण्याचा निर्णय घेतला हेही तिने यावेळी सांगितलं होतं. सायशा शिंदे एक सेलिब्रेटी डिझायनर आहे. तिने दीपिका पादुकोण, करीना कपूर, कटरीना कैफ, श्रद्धा कपूर, प्रियंका चोपड़ा, माधुरी दीक्षित, सनी लियोनी, तापसी पन्नू, भूमि पेडनेकर आणि हिना खान यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.

Story img Loader