ईराणी अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी सध्या कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यापूर्वी, करण कुंद्रासोबत तिचा ‘वुमन कार्ड’वरून वाद झाला होता, त्यानंतर तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला, पण ती गेली नाही. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या आधीच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

लॉकअपमध्ये मंदाना करीमी आणि स्पर्धक अजमा फल्लाह यांच्यात वाद झाला. त्याचवेळी मंदाना लग्नाचं गुपित सगळ्यांना सांगितलं. अजमाशी बोलताना मंदाना म्हणाली, “माझं लग्न वयाच्या २७ व्या वर्षी झालं. त्या आधी अडीच वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये राहिलो त्यानंतर साखरपूडा झाला. त्यानंतर ७ महिने आमचं रिलेशनशिप खूप सुंदर होतं मग आम्ही लग्न केलं. त्यानंतर बराच काळ आम्ही लांब राहिलो आणि नंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये आम्ही घटस्फोट घेतला. या ४ वर्षात तो माझ्या ओळखीच्या सगळ्यांसोबत झोपला एवढंच मला माहीत होतं.”

आणखी वाचा : “माझा धर्म परिवर्तन करून, मंदिरासमोर…”; ईराणी अभिनेत्री मंदाना करीमीने सांगितले लग्नानंतरचे धक्कादायक वास्तव

आणखी वाचा : Lock Upp : पूनम पांडेने केले कॅमेरासमोर टॉपलेस होण्याचे वचन पूर्ण, एलिमिनेशनपासून वाचल्यानंतर काढला टी-शर्ट

हे ऐकून अजमाला धक्का बसला आणि विचारते, “त्या मित्र-मैत्रिणी होते का?” यावर मंदाना म्हणते, “माझे कोणी मित्र नाहीत.” त्याला आधी घटस्फोट का दिला नाही, असे विचारले असता? यावर मंदाना म्हणाली, “हा माझ्या सीक्रेटचा एक भाग होता, कारण ते कोणालाच माहीत नाही.”

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

दाना करीमी आणि गौरव गुप्ता यांनी २०१७ मध्ये जानेवारीमध्ये लग्न केले होते. तिचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला होता, मात्र गौरवने तिचा धर्म बदलत तिच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचा आरोप तिने केला होता. मंदानाने लग्नाच्या ६ महिन्यांनंतर गौरव आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत जुलैमध्ये गुन्हा दाखल केला होता, परंतु ऑगस्टमध्ये एक महिन्यानंतर तिने तक्रार मागे घेतली.

Story img Loader