ईराणी अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी सध्या कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यापूर्वी, करण कुंद्रासोबत तिचा ‘वुमन कार्ड’वरून वाद झाला होता, त्यानंतर तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला, पण ती गेली नाही. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या आधीच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॉकअपमध्ये मंदाना करीमी आणि स्पर्धक अजमा फल्लाह यांच्यात वाद झाला. त्याचवेळी मंदाना लग्नाचं गुपित सगळ्यांना सांगितलं. अजमाशी बोलताना लग्नापूर्वी तिच्या बॉसफ्रेंडची आई तिला फुले आणि डोनट्स पाठवत असे, असा म्हणतं मंदाना म्हणाली, “आम्ही कॉफी, शॉपिंग, पार्ट्या आणि स्पालाही जायचो. मी कधीच एकटी जाऊ नये अशी तिची इच्छा होती. मी एकटी बाहेर जायचे तरी ती सगळ्यांना फोन करून विचारायची की मी खरंच त्या ठिकाणी आहे का?”

आणखी वाचा : Lock Upp : पूनम पांडेने केले कॅमेरासमोर टॉपलेस होण्याचे वचन पूर्ण, एलिमिनेशनपासून वाचल्यानंतर काढला टी-शर्ट

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

मंदाना पुढे तिच्या सासू विषयी सांगताना म्हणाली, “लग्नानंतर अचानक सर्व काही बदलले आणि फक्त सलवार कमीज घाला, मंदिरासमोर बसा… असे झाले. अविवाहित असलेल्या मित्र-मैत्रिणींशी ती मला बोलू देत नव्हती. त्याचा वाईट परिणाम होतो असे ती म्हणायचे. मग मला समजले की मित्र किंवा कुटुंब कोणीही असो, जर तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हाला काही बोलायची गरज नसते.”

आणखी वाचा : Ram Charan Gifts Gold Coins: RRRच्या यशानंतर क्रू मेंबर्सना भेट म्हणून दिली ‘इतक्या’ लाखाची सोन्याची नाणी

मंदाना करीमी आणि गौरव गुप्ता यांनी २०१७ मध्ये जानेवारीमध्ये लग्न केले होते. तिचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला होता, मात्र गौरवने तिचा धर्म बदलत तिच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचा आरोप तिने केला होता. मंदानाने लग्नाच्या ६ महिन्यांनंतर गौरव आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत जुलैमध्ये गुन्हा दाखल केला होता, परंतु ऑगस्टमध्ये एक महिन्यानंतर तिने तक्रार मागे घेतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lock upp show mandana karimi shocking revelation about ex husband and in laws says tried to convert my religion dcp