मागच्या काही दिवसांपासून कंगना रणौतचा शो ‘लॉकअप’ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. शोमधील सदस्य तहसीन पुनावालानं काही दिवसांपूर्वीच स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. भारतातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या पत्नीसोबत सेक्स करण्याची ऑफर त्याला मिळाली होती असं त्यानं या शोमध्ये सांगितलं होतं. तहसीननं हे सीक्रेट सायशा शिंदेला बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी सांगितलं होतं. ज्याची नंतर बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता तहसीननं शोमधून बाहेर आल्यानंतर यावर पुन्हा भाष्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वीच असल्याचं तहसीननं म्हटलं आहे. तो म्हणाला, ‘माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग खूप जुना आहे. ही २० वर्षांपूर्वीची घटना आहे आणि एका रिअलिटी शोमध्ये बचावासाठी मी त्याचा वापर केला. मी हे गुपित सर्वांसमोर यासाठी उघड केलं कारण या शोच्या फॉरमॅटमधील हा सर्वात मजेदार भाग होता आणि अखेर हा फक्त एक खेळ आहे.’
आणखी वाचा- पत्नी जया बच्चनसमोर अमिताभ यांनी रेखा यांना लावला होता रंग, अन्…
स्वतःच्या गेम पार्टनरला वाचवण्यासाठी अशाप्रकारचं गुपित उघड करण्याच्या प्रश्नावर तहसीन म्हणाला, ‘सायशा माझी मैत्रीण आहे आणि मला वाटतं एक ट्रान्सजेंडर म्हणून तिच्या संघर्षाची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. तिच्यासमोर माझं हे गुपित खूपच लहान आहे. म्हणूनच मी या घटनेबद्दल बोलण्याआधी अजिबात विचार केला नाही. माझ्याशाठी सायशा या शोमध्ये राहणं गरजेचं आहे.’
आणखी वाचा- The Kashmir Files वर आर माधवनची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला “मला खूप…”
काय म्हणाला होता तहसीन पुनावाला
शोमधून बाहेर पडण्याआधी झालेल्या एका टास्कमध्ये तहसीन म्हणाला होता, ‘भारतातील एका प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजकानं मला त्याच्या पत्नीसोबत सेक्स करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी त्यानं माझा संपूर्ण नाइटक्लब विकेंडसाठी बुक केला होता. त्याची अट होती की जेव्हा मी त्याच्या पत्नीसोबत सेक्स करेन त्यावेळी त्याला ते पाहायचं होतं. ही त्यांची फॅन्टसी होती आणि मला यात काही गैर वाटत नाही. ही माझ्या लग्नाच्या आधीची घटना आहे त्यामुळे जेव्हा मी मोनिका वढेराशी लग्न केलं तेव्हा तिला याबद्दल सांगितलं होतं.’