‘लॉक अप’ शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारूखी सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. त्याच्या या विजेतेपदानंतर त्याचे चाहते आनंदात आहेत. पण यासोबत चर्चा आहे ती या शोच्या सक्सेस पार्टीमध्ये त्याच्यासोबत दिसलेल्या मिस्ट्री गर्लची. आता मुनव्वरनं मिस्ट्री गर्ल नाझिला सिताशीसोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर नाझिलानं काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
नाझिलानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मुनव्वर नाझिलासोबत रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. मुनव्वरनं त्याची गर्लफ्रेंड नाझिलाचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटो नाझिलानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये मुनव्वरच्या हातात लाल गुलाबांचा बुके दिसत असून त्याने दुसऱ्या हाताने नाझिलाचा हात पकडला आहे. हे फोटो शेअर करताना नाझिलानं लिहिलं, ‘दोन्ही सेलिब्रेशन एकत्र’
आणखी वाचा- “हे फारच लज्जास्पद…” दिवंगत पत्नीच्या उल्लेखानंतर शशी थरूर विवेक अग्निहोत्रींवर संतापले
मुनव्वर आणि नाझिलाचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात दोघंही रोमँटिक अंदाजात मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत. नाझिला आणि मुनव्वर यांच्या या फोटोवर युजर्सच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसत आहे. एका युजरनं लिहिलं, ‘अभिनंदन वहिनी’ तर आणखी एका युजरनं लिहिलं, ‘परफेक्ट जोडी’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी कमेंट करत या दोघांचं अभिनंदन करत त्यांच्या नात्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणार का अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’? अभिनेत्यानं दिलं उत्तर
दरम्यान या आधी नाझिला मुनव्वरसोबत ‘लॉक अप’च्या सक्सेस पार्टीमध्ये दिसली होती. त्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्याआधी मुनव्वरनं लॉकअपमध्ये असतानाही नाझिलाचा उल्लेख करत तिचं खूप कौतुक केलं होतं. आता या दोघांनीही ते नात्यात असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र मुनव्वर आधीच विवाहित असून त्याचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे. लग्नाच्या ५ वर्षांनंतर दोघंही वेगळे झाले असून मागच्या दीड वर्षापासून मुनव्वर पत्नी आणि मुलापासून वेगळा राहत आहे.