बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या कंगनाचा लॉक अप हा शो चांगलाच चर्चेत आहे. आता शो फायनलमध्ये आला आहे. पहिल्याच दिवसापासून वाद विवाद पाहायला मिळत आहेत. शोमध्ये नुकतीच स्पर्धकांच्या घरच्यांनी हजेरी लावली होती. यावेळी कैदी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून खूप भावूक होताना दिसले. सगळ्यात आधी अंजली अरोराची आई आली आणि त्यांनी तिला मुन्नावर फारूकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याचा व्हिडीओ ऑल्ट बालाजीने शेअर केला आहे. या व्हिडीओत सगळ्या स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्य हजेरी लावताना दिसतात. यावेळी अंजली तिच्या आईला विचारते की “ती शोमध्ये राहण्यासाठी जे काही करते ते स्क्रीनवर चांगलं दिसतं का?” यावर उत्तर देत अंजलीची आई यावेळी बोलते, “तुरुंगात कुणी कुणाचं नाही, सगळे त्यांचा गेम खेळत आहेत.” हे ऐकून अंजलीने विचारले, “मुनाव्वरही नाही?” अंजलीच्या प्रश्नावर तिची आई म्हणाली, “कुणी नाही. कुणावरही विश्वास ठेवू नका.” तिच्या आईने डोळे उघडे ठेवून खेळण्याचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक

आणखी वाचा : शाहरुख खानने बदलीली मन्नतची Name Plate, केले इतके पैसे खर्च

जेव्हा मुनव्वर अंजलीच्या आईला भेटतो तेव्हा अंजलीची आई त्याला बोलते की, तो एक चांगला व्यक्ती आहे आणि ते दोघे मित्र म्हणून चांगले आहेत. पुढे अंजलीशी बोलताना तिची आई म्हणाली, “त्याच्यापासून थोडं लांब राहा. तुझी सगळी मतं त्याला जात आहेत.” हे ऐकून अंजलीला धक्का बसला. तिने अंजलीला असेही सांगितले की जेव्हा तिने मुनव्वरला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते, ते व्हिडीओ देखील बाहेर आले आहेत.