Logina Salah : मिस युनिव्हर्स स्पर्धा म्हणजे पोशाख, त्वचा आणि बुद्धी या सर्वांच्या सौंदर्याचा मेळ आहे. या स्पर्धेत दरवर्षी अनेक सुंदर तरुणी सहभाग घेतात. प्रत्येक देशातील तरुणी, अभिनेत्री या स्पर्धेतून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. अशात इजिप्तच्या लॉगिना सलाहने या स्पर्धेत मोठा इतिहास रचला आहे. त्वचारोग असूनही तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे आता सर्वत्र तिचं कौतुक केलं जात आहे.

मिस युनिव्हर्स २०२४ ही ७३ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा होती. मेक्सिको सिटीमधील एरिना सीडीएमएक्स येथे १६ नोव्हेंबर २०२४ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजर थेलविगने मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकला आहे. असे असले तरी, सोशल मीडियावर या स्पर्धेतील इजिप्तची स्पर्धक लॉगिना सलाहची मोठी चर्चा रंगली आहे.

Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mohan bhagwat
Mohan Bhagwat : “घरवापसीमुळे आदिवासी देशद्रोही झाले नाहीत!” प्रणब मुखर्जींच्या विधानाचा मोहन भागवतांनी दिला दाखला
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Jasprit Bumrah Wins ICC Mens Player of the Month for December 2024 For exceptional performances in IND vs AUS test Series
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Novel sports Competition Rita Bullwinkle
रेंगाळत ठेवणारी मनलढाई…

हेही वाचा : “महादेव जोपर्यंत बोलवत नाहीत…” शिल्पा शेट्टी पतीबरोबर पोहोचली महाकालेश्वरला; देवाकडे मागितली ‘ही ‘ महत्त्वाची गोष्ट

इजिप्तच्या लॉगिना सलाहने मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत टॉप ३० मध्ये स्थान मिळवले आहे. ७३ वर्षांच्या इतिहासात टॉप ३० मध्ये स्थान मिळवणारी इजिप्तची ही पहिलीच स्पर्धक आहे. लॉगिना सलाहला त्वचारोग आहे, मात्र तरीही तिने या स्पर्धेत भाग घेऊन तिच्या प्रतिस्पर्धकांना तगडी टक्कर दिली.

कोण आहे लॉगिना सलाह?

लॉगिना सलाहचा जन्म २१ एप्रिल १९९० रोजी इजिप्तमध्ये झाला. लॉगिना सलाहला एक लहान मुलगी आहे. तिला आधीपासूनच या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होती, मात्र तिच्या शरीरावर पांढरे चट्टे उमटल्याने या त्वचारोगाने ती चिंतेत होती. सौंदर्याची परिभाषा बदलण्यासाठी तिने Beyond The Surface Movement लॉंच केले. यामध्ये महिला सशक्तीकरण आणि लहान मुलांसाठी काम केले जाते.

त्वचा रोग असूनही लॉगिना सलाहने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत टॉप ३० मध्ये स्थान मिळवल्यानंतर इजिप्तमध्ये या विजयाचा मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर सध्या लॉगिना सलाहचे फोटो फार व्हायरल होत आहेत. इजिप्तच्या इतिहासात मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत टॉप ३० मध्ये स्थान मिळवलेली लॉगिना सलाह पहिलीच स्पर्धक आहे.

हेही वाचा : Bigg Boss 18: सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये रजत दलालकडे दिला मोठा अधिकार; ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजर थेलविग ठरली २०२४ ची मिस युनिव्हर्स

मिस युनिव्हर्स २०२४ च्या स्पर्धेत विजयाचा मुकूट डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजर थेलविगने पटकावला आहे. डेन्मार्कच्या इतिहासातील हा पहिलाच विजय आहे. व्हिक्टोरिया फक्त २१ वर्षांची आहे. ती एक डान्सर आणि उद्योजिका आहे. सोशल मीडियावर नेटकरी व्हिक्टोरियाच्या विजयाचेदेखील भरभरून कौतुक करत आहेत.

Story img Loader