Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि काही तासांत ट्रेंड दिसायला सुरुवात झाली आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक बॉलीवूड स्टार्सही आपले नशीब आजमावत आहेत. काही जण तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात सर्वाधिक चर्चा झाली ती कंगना रणौतची. मंडी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या कंगनाने निवडणूक जिंकल्यास चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेईन, असे सांगितले आहे. त्याशिवाय अरुण गोविल, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा हे स्टार्सही रिंगणात आहेत. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ…

१) कंगना रणौत

कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. पूर्णवेळ राजकारण करण्याच्या इराद्याने ती राजकारणात आली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगनाची काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंगबरोबर कडवी टक्कर सुरू आहे. कंगना सध्या २००० मतांनी आघाडीवर आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
warora assembly constituency
वरोऱ्यात सर्वच उमेदवार नवखे, अभूतपूर्व रणधुमाळीत कोण बाजी मारणार ?
maharashtra assembly election 2024 narahari jhirwal vs sunita charoskar dindori assembly constituency
लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
star pravah this marathi actor enters marathi serial subhavivah
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री! पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या भूमिकेचं नाव, म्हणाला…
Neelam Rane on Nitesh Rane
Neelam Rane : “आई म्हणून मला भीती वाटते…”, नितेश राणेंबाबत नीलम राणेंना वाटते ‘ही’ काळजी!

२) अरुण गोविल

यावेळी मेरठची जागाही अरुण गोविल यांच्यामुळे चर्चेत आली आहे. रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांची प्रतिमा लोकांमध्ये चांगली आहे. ते भाजपाकडून सपा उमेदवार सुनीता वर्मा यांच्याविरोधात लढत आहेत.

३) हेमा मालिनी

हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. हेमा मालिनी काँग्रेसचे मुकेश धनगर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. हेमा मालिनी २०१४ मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकल्या. त्यानंतर २०१९ मध्ये त्या मथुरा मतदारसंघातून खासदार झाल्या. यंदा काय निकाल लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहिली, तर हेमा मालिनी सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत.

४) रवी किशन

भोजपुरी स्टार रवी किशन यांनी २०१४ मध्ये काँग्रेसच्या जौनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये रवी किशन यांनी गोरखपूरमधून भाजपाच्या जागेवरून निवडणूक लढवली आणि त्यांच्या स्टारडममुळे ते जिंकले. यावेळी ते पुन्हा एकदा या जागेवरून भाजपकडून निवडणूक लढवीत आहेत. ते सपाच्या उमेदवार काजल निषाद यांच्याविरोधात उभे राहिले आहेत.

५) मनोज तिवारी

ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी भाजपाकडून निवडणूक लढवीत असून, त्यांची लढत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारशी आहे. मनोज तिवारी हे एकमेव नेते आहेत; ज्यांच्या तिकिटाची पुनरावृत्ती भाजपाने दिल्लीतून केली आहे. मनोज तिवारी यांनी पहिल्यांदा २००९ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. ते दिल्लीचे भाजपा अध्यक्षही राहिले आहेत.

६) शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा हे टीएमसीच्या वतीने पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. शत्रुघ्न यांनी १९९२ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. नवी दिल्ली पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार राजेश खन्ना यांच्याविरोधात उभे राहिले होते; पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २००९ व २०१४ मध्ये शत्रुघ्न यांना बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात आले आणि दोन्ही वेळा ते विजयी झाले. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते. २०१९ मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तीन वर्षांनंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला.

७) पवन सिंग

भोजपुरी स्टार पवन सिंग यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. रोहतास व औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ विलीन करून तयार करण्यात आलेल्या कराकत जागेवरून ते निवडणूक लढवीत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ मध्ये भाजपाने त्यांना आसनसोलमधून उमेदवार केले होते; पण त्यांना आराह जागेवरून निवडणूक लढवायची होती. त्यामुळे त्यांनी तिकीट परत केले आणि करकटमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

८) निरहुआ

आझमगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरहुआ पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. २०१९ मध्ये भाजपाने त्यांना आझमगडमधून अखिलेश यादव यांच्याविरोधात तिकीट दिले होते; परंतु ते त्या निवडणुकीत पराभूत झाले.