सततच्या कटकारस्थानांच्या मालिकांच्या धबडग्यात एखादी हलक्या फुलक्या विषयाची काहीशी विनोदी मालिका सुरू होणार अशी फक्त बातमी मिळाली तरीसुद्धा प्रेक्षक सुखावतो. नायिकेवर होत असलेला अन्याय, अत्याचार, तिचा संघर्ष, घरातलाच कोणी एक सदस्य शत्रूपक्षात, कुरघोडी, बदला वगैरेचा पाढा आता प्रेक्षकांनाही पाठ झालाय.  या भाऊगर्दीत दाखल झाली ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका. मालिकेच्या प्रोमोवरून विषय लक्षात आला होताच. एका एकत्र कुटुंबातल्या मुलीचं लग्न जमवण्याची लगबग हा मालिकेचा विषय. घराघरातली ही कहाणी असल्यामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण.. हा ‘पण’ आलाच इथेही. सगळं फुस्स झालं.
देशपांडे घरात नूपुर ऊर्फ नकटु लग्नाची आहे. तिचं लग्न जमवण्यासाठी घरातले सगळेच जण आटापिटा करताहेत. यामागे त्यांचं नकटुविषयीचं प्रेम तर आहेच पण त्याचं आणखी एक कारणही आहे. तिचं लग्न झाल्यानंतरच देशपांडेंच्या जुन्या घराच्या जागी मोठा टॉवर उभा राहणार आहे. अशी तिच्या आजोबांची अट. आपल्याकडे गेलेल्या माणसांचा आणि त्यांनी घातलेल्या अटी, स्वप्नं, इच्छा यांचा फार विचार केला जातो. तसेच आहेत देशपांडेसुद्धा. घर अगदी पडायला आलंय पण त्यांना त्यापेक्षा अट जास्त महत्त्वाची वाटते. दर आठवडय़ाला एक विवाहेच्छुकमुलगा नकटुला बघायला येतो आणि नकार घेऊन किंवा देऊन घराबाहेर पडतो. त्या दिवसांत झालेली गडबड, गोंधळ म्हणजे ‘नकटीच्या..’ ही मालिका.

काही लग्नाळू मुलींची उत्सुकता प्रचंड तीव्र असते. छोटय़ा गोष्टींनाही अनावश्यक आवाजात, आविर्भावात, लाडिक सुरात प्रतिसाद देणे जरा ‘ओव्हर’च वाटतं, हे खरंय. पण मालिकेतली नूपुर काही प्रमाणात अति वाटते. तिचं लग्न, संसार, राजकुमार, मुलगा बघणं वगैरे याच गोष्टी तिच्या आयुष्यात आहेत का? दुसरं काहीच असू नये? वर्तमानपत्रात येत असलेल्या भविष्यावर ती इतका विश्वास ठेवते? स्वत:च्या तंद्रीत इतकं असावं की घरातल्या इतरांच्या आयुष्यात काय घडतंय याचा तिला थांगपत्ताच नसतो? हे सगळं पटत नाही. नूपुरसारख्या मुली खऱ्या आयुष्यात असतीलही किंबहुना असतातही. पण, त्याचं अतिरंजित करणं खटकणारं आहे.

reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
amber heard to be mother second time
घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
mamta kulkarni is single says left vicky goswami
प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

असाच अतिरंजितपणा काही गोष्टींमध्ये ठळकपणे दिसून येतं. नकटुच्या आत्याचा नवरा सतत दारू पिताना दाखवलाय. त्या घरातले लोक जितक्या हिरीरीने नकटुचं लग्न लावायला तयार आहेत त्या जोमाने त्याची दारू सोडवायला नाहीत. संवादही विशेष नाहीत. सतत नकटुचं तिच्या स्वप्नातच रमणं, असंदर्भ बडबडणं, लग्न ठरण्याचा पत्ता नाही आणि उखाणे तयार करणं, मुलगा मुलीला नुसता बघायला आलाय तर अख्ख्या घरातल्यांनी त्याला जावई, जीजू असं सतत संबोधणं, घरात जरा मोठा आवाज झाला की मोडकळीला आलेल्या घराचे पिलर्स धरणं हे सगळं अतिशय बालिश, बाळबोध वाटतं. प्रसाद ओक ही व्यक्तिरेखा एका आठवडय़ात विवाहेच्छुक मुलगा म्हणून मालिकेत होती. त्याची दृष्टी संध्याकाळी सहानंतर जात असते. त्यानंतरही तो देशपांडय़ांच्या घरी थांबतो. त्याला दिसत नाहीये हे देशपांडय़ांच्या कोणालाही जाणवत नाही, याची कमाल वाटते. एखादा अनोळखी माणूस जरा विचित्र वागताना दिसला की काहीतरी गडबड आहे हे चटकन समजते. मग मालिकेत हे असं? ‘मालिका आहे ती. सोडून द्यायच्या अशा गोष्टी’ या समर्थनाला आणखी किती दुजोरा द्यायचा? नेहमीच्या मालिकांना ब्रेक देऊन काही हलकंफुलकं देऊया हा विचार स्तुत्यच होता. पण, तो विचार प्रत्यक्षात उतरवताना चहूबाजूंनी विचार करायला हवा.

मालिकेत चांगल्या, अनुभवी  कलाकारांची फौज असूनही मालिका गंडली आहे. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा बघणं हे थोडय़ा प्रमाणात मनोरंजन करतं. कलाकारांचा अभिनय चांगला झालाय. नकटु ही व्यक्तिरेखा ‘अति’ दाखवायचा प्राजक्ताने चांगला प्रयत्न केलाय. मालिकेचं शीर्षकगीत मजेशीर आहे. गुणगुणायला लावतं.

घराघरातला विषय असला तरी त्याचं सादरीकरण, मांडणी, एकत्रीकरण, प्रसंगांची सुसूत्रता, पटकथेचा वेग, नावीन्य हे सगळं महत्त्वाचं ठरतं. प्रेक्षकांच्या घरातला विषय मालिकेत दाखवला की प्रेक्षक हमखास बघणारच, हा समज आता प्रेक्षकच खोटा ठरवत चाललाय. दर आठवडय़ाला एक विवाहेच्छुक मुलगा नकटुला बघायला येणार, हा साचा गेला महिनाभर सुरू आहे. हे असंच चालू राहीलं, तर त्यात नावीन्य ते काय येणार, हाही प्रश्न उरतोच.

टीव्हीवर अगदीच काहीच बघण्यासारखं नसेल किंवा इतर काही बघून कंटाळा आला असेल तर ही मालिका बघायला हरकत नाही. ही मालिका तुमचं मनोरंजन करेल पण ते तात्पुरतं असेल. या मालिकेचा एखादा भाग चुकलाच तरी नो टेन्शन. या मालिकेत नकटुचं लग्न हा एकच विषय सलग आहे. दर आठवडय़ाला नवीन मुलगा येऊन त्या-त्या आठवडय़ाची पटकथा वेगळी असते. त्यामुळे तुम्ही खूप काही मिस केलंय असं अजिबात वाटून घेऊ नका.  बौद्धिक काही बघायचं असेल किंवा आशयघन मालिकेच्या तुम्ही प्रतीक्षेत असाल तर ही मालिका तुमच्यासाठी नाही! बाकी मर्जी आप की!

response.lokprabha@expressindia.com@chaijoshi11
सौजन्य- लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader