सततच्या कटकारस्थानांच्या मालिकांच्या धबडग्यात एखादी हलक्या फुलक्या विषयाची काहीशी विनोदी मालिका सुरू होणार अशी फक्त बातमी मिळाली तरीसुद्धा प्रेक्षक सुखावतो. नायिकेवर होत असलेला अन्याय, अत्याचार, तिचा संघर्ष, घरातलाच कोणी एक सदस्य शत्रूपक्षात, कुरघोडी, बदला वगैरेचा पाढा आता प्रेक्षकांनाही पाठ झालाय. या भाऊगर्दीत दाखल झाली ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका. मालिकेच्या प्रोमोवरून विषय लक्षात आला होताच. एका एकत्र कुटुंबातल्या मुलीचं लग्न जमवण्याची लगबग हा मालिकेचा विषय. घराघरातली ही कहाणी असल्यामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण.. हा ‘पण’ आलाच इथेही. सगळं फुस्स झालं.
देशपांडे घरात नूपुर ऊर्फ नकटु लग्नाची आहे. तिचं लग्न जमवण्यासाठी घरातले सगळेच जण आटापिटा करताहेत. यामागे त्यांचं नकटुविषयीचं प्रेम तर आहेच पण त्याचं आणखी एक कारणही आहे. तिचं लग्न झाल्यानंतरच देशपांडेंच्या जुन्या घराच्या जागी मोठा टॉवर उभा राहणार आहे. अशी तिच्या आजोबांची अट. आपल्याकडे गेलेल्या माणसांचा आणि त्यांनी घातलेल्या अटी, स्वप्नं, इच्छा यांचा फार विचार केला जातो. तसेच आहेत देशपांडेसुद्धा. घर अगदी पडायला आलंय पण त्यांना त्यापेक्षा अट जास्त महत्त्वाची वाटते. दर आठवडय़ाला एक विवाहेच्छुकमुलगा नकटुला बघायला येतो आणि नकार घेऊन किंवा देऊन घराबाहेर पडतो. त्या दिवसांत झालेली गडबड, गोंधळ म्हणजे ‘नकटीच्या..’ ही मालिका.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा