२०१७ आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉईज’ ‘बॉईज २’ ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. त्यानंतर आता येत्या १६ सप्टेंबरला ‘बॉईज ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांचे त्रिकूट आणि त्यांच्या आयुष्यात येणारी कानडी मुलगी अशी एक भन्नाट कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने ‘बॉईज ३’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी निर्माता अवधूत गुप्ते, दिग्दर्शक विशाल देवरुखकर, अभिनेता प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे, अभिनेत्री विदुला चौगुले, स्नेहल छिदम यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.
या चित्रपटाच्या दोन्ही भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले होते. त्यानंतर आता ‘बॉईज ३’ ची टीम प्रेक्षकांना पोटभर हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘बॉईज ३’मध्ये धैर्य, ढुंग्या आणि कबीर हे त्रिकूट बेळगावात जाऊन मजा-मस्ती करताना दिसणार आहे. त्यावेळी शूटींगदरम्यान पडद्यावर आणि पडद्यामागे काय काय गंमतीजमती घडल्या? या चित्रपटाची कथा कशी सुचली? या भागात प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.