२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट आज शुक्रवारी (५ ऑगस्ट) पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले होते. त्यानंतर आता ‘दे धक्का २’ ची टीम प्रेक्षकांना पोटभर हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘दे धक्का २’मधील जाधव कुटुंबिय लंडनला पोहोचलं आहे. त्यावेळी शूटींगदरम्यान पडद्यावर आणि पडद्यामागे काय काय गंमतीजमती घडल्या? या चित्रपटाची कथा कशी सुचली? या भागात प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला.

या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दे धक्का २ हा चित्रपट आज (५ ऑगस्ट) संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta digital adda de dhakka 2 marathi movie starcast special interview nrp