रेश्मा राईकवार

एका वेगळय़ाच विश्वाची सफर घडवणारा चित्रपट पाहण्याची संधी साय-फाय चित्रपटांव्यतिरिक्त फार कमी मिळते. नेटफ्लिक्स वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटाने एका कादंबरीतील अजब पात्रांचं गजब विश्व उभं केलं आहे. ही कुठलीही परीकथा नाही, त्यामुळे यातली पात्रं पूर्णपणे काल्पनिक नाहीत. मात्र खरोखरच विचित्र स्वभाव, खोटय़ा चेहऱ्यांमागे दडवलेले त्यांचे भूतकाळ या सगळय़ाच गुंतागुंतीचं तर्कट असलेलं कथानक एका खुनामुळे उलगडत जातं. या व्यक्तिरेखांचे स्वभाव, त्यांचे विचार, कृती यातून उभा राहिलेला खेळ ही या चित्रपटाची खरी गंमत आहे.

A Pune driver installed an aquarium in auto rikshaw
‘पुणे तिथे काय उणे!’ रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी रिक्षात काय ठेवले पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
tharla tar mag new promo yed lagla premacha fame raya manjiri enters the show
ठरलं तर मग : सायलीच्या मदतीला आले २ नवीन पाहुणे! पंढरपुरातून आणली ‘ही’ खास वस्तू, अर्जुनला ‘असं’ पळवून आणणार…; पाहा प्रोमो
Nashik Saraf Association and Police discussed installing high qualitycctv cameras to prevent thefts
दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना, सराफ व्यावसायिक-पोलीस आयुक्त बैठक
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Festival of 16 films by German director Wim Wenders
जर्मन दिग्दर्शक विम वेंडर्स यांच्या १६ चित्रपटांचा महोत्सव; या चित्रपटांचे खेळ
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक

अनुजा चौहान यांच्या ‘क्लब यु टु डेथ’ या कादंबरीवर होमी अदजानिया दिग्दर्शित ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट आधारित आहे. या कादंबरीच्या शीर्षकाप्रमाणेच एका उच्चभ्रू क्लबशी या चित्रपटाचं कथानक जोडलं गेलं आहे.

‘द रॉयल दिल्ली क्लब’ या ब्रिटिशकालीन क्लबमध्ये दररोज येणाऱ्या व्यक्तींशी जोडलेली गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळते. त्यातल्या नेमक्या गोष्टीशी संबंधित व्यक्तिरेखांची ओळख दिग्दर्शक आपल्याला सुरुवातीलाच करून देतो.

एकेकाळचं वैभव गमावून बसलेला महाराजा रणविजय सिंग (संजय कपूर) आताही त्याचा राजेमहाराजांचा पीळ गेलेला नसला तरी सध्या कंगाल असलेला हा महाराजा क्लबमधल्या कर्मचाऱ्यांना २० रुपयाची नोट टिप म्हणून देऊ करतो. आणि क्लबमधलंच शिल्लक खाणं गरिबांना वाटण्याच्या नावाखाली घरी पार्सल नेतो. तकीला आणि बीटाचा रस एकत्र करून चवीचवीने पिता पिता क्लबमधल्या गजाली करणारी कुकी आँटी (डिंपल कपाडिया), व्यसनी मुलाच्या प्रेमात बुडालेली, त्याला सतत पाठीशी घालणारी बात्रा (टिस्का चोप्रा), बी ग्रेड चित्रपटांची नायिका शहनाझ (करिश्मा कपूर), तडक भडक दिसणारी आणि वावरणारी पण मनाने हळवी बांबी तोडी (सारा अली खान), तिच्यावर काही न बोलता जीवापाड प्रेम करणारा आकाश ऊर्फ काशी (विजय वर्मा), क्लबचा गोलमटोल व्यवस्थापक (देवेन भोजानी), नोकर गप्पीराम (ब्रजेंद्र कार्ला) ही त्यातल्या त्यात महत्त्वाची म्हणता येतील अशी चिवित्र पात्रं. या प्रत्येकाने एक मुखवटा चढवलेला आहे. हा मुखवटा घालून क्लबमध्ये येणाऱ्या या प्रत्येकाचा खरा चेहरा वेगळाच आहे. यात रोजचे क्लबचे सदस्य आहेत आणि तिथला कर्मचारी वर्गही आहे. या उच्चभ्रू क्लबमध्ये जिम प्रशिक्षक असलेल्या लीओ मॅथ्यूजचा खून होतो आणि त्या खुनाच्या तपासाच्या अनुषंगाने या सगळय़ांचं गुपित आणि त्यांच्यातील ताणेबाणे एकेक करत उलगडत जातात.

हेही वाचा >>>तरुणाईचा लाडका गायक आतिफ अस्लमने लेकीची दाखवली पहिली झलक; म्हणाला…

या चित्रपटात घडणारी हत्या आणि त्यामागचा सूत्रधार शोधणं या प्रक्रियेतलं रहस्य केंद्रस्थानी आहे हे खरं असलं तरी खरी गंमत त्यात नाही. चित्रपटाचा जोर हा या खुनासाठी संशयित असलेल्या क्लबमध्ये रोज येणाऱ्या आणि लीओशी रोजचा संबंध असलेल्या या पात्रांवर आहे. या प्रत्येक पात्रासाठी दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी कलाकारांची फार विचारपूर्वक निवड केली आहे. तपास अधिकारी भवानी सिंग यांची भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी केली आहे. पंकज त्रिपाठी आपल्या पद्धतीने हरएक व्यक्तिरेखेसाठी एक वेगळा हेल, देहबोली निवडतात. भवानी सिंगही त्याला अपवाद नाही. भवानी सगळय़ांचं सगळं ऐकून घेतो, मात्र त्याच्या चाणाक्ष नजरेतून कुठलीही बारीकशी गोष्ट सुटत नाही. लीओशी संबंधित प्रत्येक माणसाचं वर्तन, त्यांचं बोलणं, त्यांचे एकमेकांतले हेवेदावे यातून त्याच्या डोक्यात त्या प्रत्येक व्यक्तीचं चित्र निर्माण होत राहतं. या व्यक्तिरेखा आणि त्यासाठी निवडलेले कलाकार यांनी या चित्रपटात खरी गंमत आणली आहे. िडपल कपाडिया यांनी साकारलेल्या कुकीचा चित्रपटात फार मर्यादित वापर करून घेतला आहे. संजय कपूरचा महाराजाही ठीकठाक. करिश्मा कपूरची शहनाझ या सगळय़ात भाव खाऊन गेली आहे. कित्येक वर्षांनंतर तिला या भूमिकेत पाहणं तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. सारा अली खानने गेल्या काही वर्षांत आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. ‘मर्डर मुबारक’ची बांबी हा तिच्या या प्रयत्नांमधला एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल. विजय वर्मा चांगला अभिनेता आहे, मात्र इथे सारा अली खानबरोबरची त्याची केमिस्ट्री हवी तशी खुललेली नाही.

क्लबमधला आणि एकूणच उच्चभ्रू वर्गाचा दिखाऊपणा, वर्तन आणि कृतीतला विरोधाभास, वास्तवाच्या परे असलेलं त्यांचं जगणं अशा कित्येक विसंगतीवरही दिग्दर्शकाने कथेच्या ओघात भाष्य केलं आहे. बाकी कादंबरीप्रमाणे चित्रपटाची कथा उलगडत जाणारी आहे. त्यातलं खुनाचं रहस्य हे आपल्याला फारसं चकित करणारं नाही. किंबहुना ते केवळ तोंडी लावण्यापुरतं आहे. मात्र या गोष्टीतल्या पात्रांची मजेशीर गोष्ट पाहण्याची संधी ‘मर्डर मुबारक’ देतो.

मर्डर मुबारक

दिग्दर्शक – होमी अदजानिया

कलाकार सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, टिस्का चोप्रा, संजय कपूर.

Story img Loader