रेश्मा राईकवार

सिद्धार्थ आनंद नामक दिग्दर्शकाने गेल्या काही वर्षांत ‘वॉर’, ‘पठान’सारखे चांगले चित्रपट दिले आहेत. अभिनेता ह्रतिक रोशनला बरोबर घेत, त्याची आकर्षक देहयष्टी आणि स्टंट्स करण्याची क्षमता याचा पुरेपूर वापर करत या जोडीने ‘बँग बँग’ चित्रपटापासूनच या खेळाला सुरुवात केली होती. आता यशराज फिल्म्सची गुप्तहेरांवर आधारित चित्रपट श्रुंखला अधिक बळकट करण्यातही सिद्धार्थचा हातभार आहे. या चित्रपटांच्या पलीकडे देशातील हवाई दलाची कामगिरी केंद्रस्थानी ठेवत ह्रतिक आणि दीपिकासारख्या कलाकारांना घेऊन सिद्धार्थने ‘फायटर’ चित्रपटाच्या अपेक्षांचे विमानही उंच हवेत नेऊन ठेवले होते. मात्र तितक्या उंचीवरचा प्रभाव चित्रपटाला पाडता आलेला नसला तरी आपल्या कसलेल्या कलाकारांना घेऊन केलेल्या हवाई करामतींचा थरार सिद्धार्थ आनंद यांनी चांगलाच खेळवला आहे.

PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत

‘फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील काही दृश्यं यांची झलक पाहिली तरी चित्रपटावर असलेला ‘टॉप गन’ या हॉलीवूडपटाचा प्रभाव सहज लक्षात येतो. त्यातही हवाई दलावर चित्रपटाची कथा केंद्रित असल्याने काहीतरी वेगळी, स्वतंत्र कथा पाहायला मिळणार ही अपेक्षा असते. पण चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी आलेल्या ट्रेलरमधूनच या चित्रपटाला पुलवामा हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झाले होते. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात लपलेल्या जैशच्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारताकडून करण्यात आलेला हवाई हल्ला, त्यासाठी दोन्ही देशांमध्ये नेहमीप्रमाणे झालेले शह-काटशहांचे खेळ या गोष्टी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातूनही लोकांनी पाहिलेल्या आहेत. तिथे सैन्यदलाची कामगिरी अधिक महत्त्वाची होती. इथे हा चित्रपट हवाई दलाचे अधिकारी, त्यांची युद्धनीती, त्यांची देशभक्ती या अंगाने कथा खुलवत नेतो. मात्र पंतप्रधान मोदी यांचा थेट उल्लेख नसला तरी अजित डोवाल यांनी बालाकोट येथील जैशचा प्रशिक्षणतळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई, ही कारवाई यशस्वी झाल्यानंतर स्क्वॉड्रन लीडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेला पराक्रम आणि त्यांचा बंदीवास, सुटका हा कथाभाग अशा दोन वास्तव घटनांवरून प्रेरित कथाभाग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अर्थात, इथे व्यक्तिरेखा, त्यांचे उल्लेख बदलण्यात आले आहेत. मुळात वास्तव घटनांचा कथाभाग हाताशी धरत हवाई दलाचा पराक्रम, हवाई सैन्याचं एकत्रित असणं, आकाशात ऐन युद्धातला विमानांचा थरार, निर्णायक क्षणी घडणाऱ्या चुका, देशहित मोठे की वैयक्तिक प्रगती यातलं द्वंद्व असे अनेक पैलू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केला आहे.

हेही वाचा >>>VIDEO: ५ थरांचा केक, भव्य हार अन्…बॉबी देओलच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून खास आयोजन

हवाई दलाचे वैमानिक, लढाऊ विमानं उडवणाऱ्यांना मिळणारं प्रशिक्षण, त्यांचा स्वत:चा अभ्यास, शत्रूला गारद करण्यासाठी आखण्यात येणारे डावपेच हा सगळा सविस्तर भाग बालाकोट येथील हवाई हल्ल्याच्या घटनेची पार्श्वभूमी घेत रंगवण्यात सिद्धार्थ आनंद यांना यश आलं आहे. मुळात अशाप्रकारच्या चित्रपटांच्या मांडणीत एक वेग असावा लागतो. केवळ थरार दिसू नये म्हणून थोडी भावनिक गुंतागुंत, सहकाऱ्यांमधील घट्ट भावबंध, थोडीशी प्रेमकथा, थोडासा भूतकाळ अशा अनेक दुव्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे की काय मात्र एक ना धड भाराभर चिंध्या असा काहीसा प्रकार हा चित्रपट पाहताना जाणवतो. हवाई दलाचा पराक्रम पाहण्याची संधी याआधी ‘बॉर्डर’ चित्रपटातून काही अंशी पाहायला मिळाली होती. ‘यह रात खत्म क्यों नही होती.. डॅम इट’ म्हणत पहाट होण्याची वाट पाहात बसलेला जॅकी श्रॉफ यांनी साकारलेला वैमानिक विसरता येणं शक्य नाही. त्यानंतर इतक्या वर्षांनी खरोखरच केवळ हवाई दलावर लक्ष केंद्रित करत त्यांच्या पराक्रमाचा थरार रंगवणारा चित्रपट देताना तंत्राच्या आणि अभिनयाच्या बाबतीत चित्रपट कुठेही कमी पडत नाही. एकावेळी अनेक गोष्टी दाखवण्याचा अट्टहास जसा चित्रपटाला मारक ठरला आहे, तसंच काही अंशी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, घर में घुसकर मारेंगे शैलीतील देशभक्तीचा अंगार दाखवणारे संवाद असा काहीसा तोचतोचपणा ‘फायटर’ पाहतानाही जाणवतो. इथे गोष्टच नवीन नसल्याने खलनायकही फारसा नवीन नाही. भारत – पाकिस्तान संबंधांपलीकडे चित्रपट पोहोचत नाही. आणि जाज्वल्य देशभक्तीची कथा सांगणारा असाच चित्रपट अगदी काही महिन्यांपूर्वी त्याच दिग्दर्शकाकडून पाहिलेला असल्याने कुठेतरी ‘फायटर’ची मांडणी, चित्रण प्रभावी असूनही तोचतोचपणाचा अनुभव चित्रपट देतो. त्याऐवजी पूर्णपणे नवीन कथा दिग्दर्शकाला देता आली असती. ह्रतिक आणि दीपिका यांची प्रेमकथा असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे अधिक दाखवा म्हणेपर्यंत चित्रपटाचा शेवट होतो आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं टुकार प्रेमाचं गाणं पाहण्यासाठीही अंमळ कळ सोसावी लागते. तोवर पिटातला अर्धा प्रेक्षक उठून गेलेला असतो.

निराशा करणाऱ्या बाजू अधिक असल्या तरी ह्रतिक रोशन त्याच्या चाहत्यांची अजिबात निराशा करत नाही. अ‍ॅक्शन आणि मनोरंजन दोन्ही बाबतीत तो कुठेही कमी पडलेला नाही. या भूमिकेसाठी आवश्यक ती शरीरयष्टी, विशिष्ट देहबोली सगळय़ाचा पुरेपूर वापर करत त्याने समशेर पठानिया ऊर्फ पॅटी या स्क्वॉड्रन लीडरची भूमिका चित्रपटात रंगवली आहे. जोडीला दीपिकानेही हेलिकॉप्टर उडवणाऱ्या वैमानिकाच्या भूमिकेत त्याला तगडी साथ दिली आहे. मात्र ह्रतिकच्या तालावर ताल धरणं दीपिकाला फारसं जमलेलं नाही. करणसिंग ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या भूमिकाही उत्तम जमून आल्या आहेत. अनिल कपूर आणि ह्रतिक रोशन या दोन मुख्य व्यक्तिरेखा चित्रपटात बराच काळ एकमेकांच्या विरोधात दाखवल्या असल्याने त्यांच्यात नजरेचं आणि शाब्दिक युद्धच खेळवलेलं अधिक दिसतं. तंत्र आणि अभिनय या दोन्ही बाबतीत ‘फायटर’ खरा उतरला आहे आणि म्हणूनच तो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात काही अंशी यशस्वी ठरला आहे. त्यामुळे हवेतला गोंधळ तेवढा चांगला उतरला आहे.. बाकी जमिनीवर येऊन कोसळला अशी काहीशी भावना मनात उरते.

फायटर

दिग्दर्शक – सिद्धार्थ आनंद

कलाकार – ह्रतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पदुकोण, करणसिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, आशुतोष राणा, शरीब हाश्मी.

Story img Loader