लोकसत्ता प्रतिनिधी

छोटय़ा पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेतील शीर्षक भूमिकेतून घरोघरी प्रसिद्ध झालेला अभिनेता किरण गायकवाड सध्या नव्या चित्रपटाच्या तयारीत रमला आहे. डीजे ते मुख्य अभिनेता हा किरणचा अभिनय प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. याच किरणला सध्या नव्या चित्रपटाचा ‘नाद’ लागला आहे. त्याच्या ‘नाद – द हार्ड लव्ह’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच भोर येथे सुरुवात झाली आहे. 

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “माझा सूर्या तुझा नाश…”, सूर्याच्या आईचा डॅडींना इशारा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
nana patekar wife neelkanti makes her acting comeback in vicky kaushal chhaava movie
Video : ‘छावा’मध्ये झळकणार नाना पाटेकरांच्या पत्नी! नव्या गाण्यात दिसली पहिली झलक, नीलकांती पाटेकर कोणती भूमिका साकारणार?
anshuman vichare enters in star pravah serial
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेला ‘हा’ अभिनेता ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत येणार! प्रोमोत दिसली झलक
kiran mane shares post for maharashtrachi hasya jatra fame rohit mane
आमचा चित्रपट येतोय…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ अभिनेत्यासाठी किरण मानेंची पोस्ट, सांगितला खास अनुभव
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
aai kuthe kay karte fame Madhurani prabhulkar entry in Aai Ani Baba Retire Hot Aahet serial
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”

शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्थांतर्गत ‘नाद’ची निर्मिती करण्यात येत आहे. संजय बाबुराव पगारे आणि रुपेश दिनकर पगारे या चित्रपटाचे निर्माते असून, दिग्दर्शनाची धुरा ‘बलोच’ फेम प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. भोरमध्ये ‘नाद’च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटाची नेमकी कथा काय हे अजून गुलदस्त्यात आहे. नायकाच्याच नव्हे, तर खलनायकी भूमिकाही अगदी सहजपणे साकारण्याची हातोटी किरणकडे आहे. त्यामुळे या चित्रपटातील नायक किरण कशा प्रकारे साकारतो हे पाहणं त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री चित्रपटात झळकणार असल्याचेही पवार म्हणाले.

हेही वाचा >>>Video: “लहान मुलांना तरी सोडा…”, पापाराझींना पाहून रितेश देशमुख वैतागला, व्हिडीओ व्हायरल

‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दीपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी वैभव देशमुख यांच्या साथीने गीतलेखनही केलं असून, त्यांच्या संगीतरचना संगीतकार पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. डिओपी अमित सिंह या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून, कला दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश चिपकर यांनी सांभाळली आहे.

Story img Loader