प्रसाद सुतार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औद्योगिकीकरणानंतर ज्या काही मोजक्या कलाकृतींचा उदय झाला, त्यातील चित्रपट कलेने जगातील सर्व थरांतील समाजावर सर्वाधिक प्रभाव टाकला. डब्यांमधील रिळांद्वारे सिनेमागृहातील पडदे तारांकित करणारा हा सिनेमा कॅसेटस्, टी.व्ही., पेन ड्राइव्ह ते आता थेट हातातील मोबाइलच्या स्क्रीनवर पाहता येऊ लागला आहे. दरम्यानच्या काळात सिनेमाचा आशय, विषय, मांडणी आणि सादरीकरणाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले. मात्र मनातील काल्पनिक प्रतिसृष्टीला अधिकाधिक परिणामकारक पद्धतीने रूपेरी पडद्यावर साकारण्याचे काम चित्रपट कला चोखपणे पार पाडत आहे. जागतिकीकरण आणि त्या ओघाने आलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे हॉलीवूडची चित्रपटसृष्टी भारताच्या अधिक जवळ आली. तेथील सिनेमांच्या प्रभावाने अथवा त्यांच्या तोडीस तोड कलाकृती निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून भारतीय सिनेमाचाही चेहरा गेल्या काही वर्षांत बदलला. सिनेमा ‘व्हिज्युअली’ अधिकाधिक करेक्ट करण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यातूनच दिग्दर्शक, कला दिग्दर्शक यांच्या जोडीने ‘व्हिज्युअल इफेक्ट तज्ज्ञ’ सिनेमा कसा दिसणार हे प्राधान्याने ठरवू लागला. गेली दोन दशके बॉलीवूडमधील सिनेमांचे ‘व्हीएफएक्स तज्ज्ञ’ म्हणून कार्यरत असलेले प्रसाद सुतार खास ‘रविवार वृत्तान्त’साठी पाक्षिक स्वरूपात चित्रपटांच्या या बदलत्या चेहऱ्याची ओळख करून देणार आहेत…

आपल्यासारखी हुबेहुब दुनिया रूपेरी पडद्यावर साकारणाऱ्या चित्रपटांविषयी अगदी सुरुवातीच्या काळापासून सर्वसामान्य रसिकांना कुतूहल वाटत आले आहे. त्या जगात वावरणारी मंडळी सर्वसामान्यांसाठी स्वप्नांचे सौदागर असतात. सिनेमागृहातील अंधारात समोरील पडद्यावर छायाप्रकाशाद्वारे साकारली जाणारी मोहमयी दुनिया रसिकांना भुलवते. त्यातूनच पडद्यावर भूमिका साकारणाऱ्या कलावंतांभोवती ग्लॅमरचे कमी-अधिक वलय निर्माण होत जाते. पडद्यावरचा हा खेळ अधिकाधिक वास्तव आणि खराखुरा वाटावा म्हणून जगभरातील अनेक सिनेकर्त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. चित्रीकरणासाठी नवनवी लोकेशन्स शोधणे, हवा तो परिणाम साधण्यासाठी भलेमोठे सेटस् उभारणे, धाडसी स्टंट करणे आदी प्रकार सिनेमा परिणामकारक करण्यासाठी केले जात होते. आताही थोडय़ा फार फरकाने हे उपाय योजले जातात. मात्र गेल्या काही वर्षांत नेमकेपणाने सांगायचे झाले तर तीन दशकांत चित्रपटाचा चेहरामोहरा ‘व्हीएफएक्स’ अर्थात स्पेशल इफेक्टस् तंत्राने पूर्णत: बदलला आहे. त्यामुळे मायावी जगातील ही स्वप्निल दुनिया अधिक भव्यदिव्य स्वरूपात साकारणे शक्य झाले आहे. नाटक हे लेखकाचे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याचे ढोबळ मानाने सांगितले जाते. या सदरात व्हीएफएक्स तंत्र चित्रपटांमध्ये कसा आणि किती प्रभाव टाकते, हे मी सांगणार आहे. दिग्दर्शकाच्या मनात असणारा नेमका परिणाम पडद्यावर प्रत्यक्षात साकारण्यासाठी तंत्रज्ञांची टीम प्रत्यक्ष चित्रीकरणानंतर फिल्मवर बरीच मेहनत घेते. बहुतेक भारतीयांनी ‘ज्युरासिक पार्क’ या सिनेमातून स्पेशल इफेक्टची जादू पाहिली. नव्वदच्या दशकात हळूहळू ‘स्पेशल इफेक्ट’चे वारे बॉलीवूडमध्येही वाहू लागले. प्रत्यक्ष चित्रीकरणाआधी पटकथा वाचून स्टोरी बोर्ड तयार करणे, प्रसंगांचे ढोबळ रेखाटन करणे आदी कामे केली जाऊ लागली. मी अगदी सुरुवातीपासून या प्रक्रियेचा एक साक्षीदार आहे. चित्रपट हा विविध कलांचा मेळ असतो. त्यात नृत्य, नाटय़, संगीत, पाश्र्वसंगीत, छायाचित्रण आदी घटकांचा समावेश असतो. त्यात ‘स्पेशल इफेक्ट’ तंत्राची भर पडली. त्यामुळे काही प्रमाणात चित्रीकरणामध्ये सुधारणा अथवा बदल करणे शक्य होऊ लागले. पूर्वी संकलकाच्या टेबलवर चित्रपटाचे भवितव्य ठरत होते. आता चित्रपटाचे व्यक्तिमत्त्व साकारण्यात स्पेशल इफेक्टस्चे मोठे योगदान असते. २० वर्षांपूर्वी जेव्हा मी या क्षेत्रात काम सुरू केले, तेव्हा भारतीय चित्रपटात हे तंत्र अगदी नवे होते. गंमत म्हणजे सुरुवातीच्या काळात अगदीच किरकोळ कामांसाठी ‘व्हीएफक्स’ तंत्र वापरले जात होते. कारण त्या माध्यमाची ताकद फारशी कुणाला माहिती नव्हती. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान झालेल्या चुका झाकण्यासाठी अथवा खोडून टाकण्यासाठी ते तंत्र वापरले गेले. व्हिज्युअल दिग्दर्शक असा स्वतंत्र विभागही नव्हता. संपूर्ण चित्रपट चित्रित झाला की त्याचे रशेस पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट तंत्रज्ञाला बोलावले जायचे. अर्थात त्यावेळचे त्याचे काम अगदी तकलादू आणि किरकोळ स्वरूपाचे होते. चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी अधिक आकर्षक करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर केला जात नव्हता. त्याची आवश्यकताही भासत नव्हती. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता पटकथा हाती पडली की चित्रीकरणाआधीच त्यातील संभाव्य स्पेशल इफेक्टस्ची दृश्ये निश्चित केली जातात.

चित्रपट निर्मिती हे एक टीमवर्क आहे. आता जवळपास दर आठवडय़ाला एखादा बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होतो. त्यामुळे पूर्वी कधीही नव्हती, इतकी स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाला आपला सिनेमा वेगळ्या पद्धतीने पडद्यावर दिसावा, असे वाटते. त्यासाठी त्यातील दृश्यात्मकतेवर खूप मेहनत घेतली जाते. प्रत्येकाला काहीतरी वेगळे, हटके आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने दाखवायचे आहे. त्यामुळे ‘व्हिज्युअल्स’ तंत्राचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. आता अशी परिस्थिती आहे की चित्रपट कमी बजेटचा असो वा बिग बजेट, हिंदी असो वा प्रादेशिक योग्य परिणामकता साधण्यासाठी ‘व्हीएफएक्स’ अपरिहार्य ठरले आहे. १९९९ मध्ये आमिर खानच्या ‘गुलाम’पासून मी माझे ‘व्हीएफएक्स’चे काम सुरू केले. त्यात आमिर खान सानपाडा रेल्वे रुळावरून वेगाने येणाऱ्या गाडीच्या दिशेने धावतानाचा एक प्रसंग आहे. त्यावेळी नायकाला प्रत्यक्ष रेल्वे रुळावरून धावण्याची आता गरज नाही, हे आमिर खानला समजावणे खूप अवघड गेले. मात्र आता अठरा वर्षांनंतर तोच आमिर खान ‘दंगल’ चित्रित करताना मात्र त्यातील व्हिज्युअल्स इफेक्टस्विषयी निर्णय घेण्याचे आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य देतो. थोडक्यात ‘गुलाम’ ते ‘दंगल’ भारतीय सिनेमासृष्टीतील व्हिज्युअल्स इफेक्ट्सचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.