‘लोकसत्ता लोकांकिका’ या नाटय़स्पर्धेतून प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता कुणाल शुक्ल याला ‘तीन पायांचा घोडा’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली असून हा चित्रपट यंदाच्या मामि महोत्सवात दाखविण्यात येणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सलग दोन वर्षे सहभाग घेऊन अभिनय करण्याची संधी मिळाली म्हणूनच करिअरच्या सुरुवातीलाच  चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यासाठी निर्माते व दिग्दर्शक आणि कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापूसकर यांनी माझी निवड केली, असे सांगून कुणाल शुक्ल याने ‘लोकसत्ता’चे आभार मानले.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच

आपले ‘लोकांकिके’तील काम या क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहोचल्याचे कुणालने यावेळी नमूद केले. योगेश जोशी लिखित आणि नूपुर बोरा दिग्दर्शित ‘तीन पायांचा घोडा’ या चित्रपटासाठी आपली निवडही ‘लोकांकिके’तील माझे काम पाहूनच कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापूसकर यांनी केली असल्याचे त्याने सांगितले.

अभिनेता कुणाल शुक्ल या तरुणाला आपल्या मेहनतीच्या बळावर व सोबतच ‘लोकांकिके’च्या प्रसिद्धीमुळे आज ‘तीन पायांचा घोडा’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्यासाठी संधी मिळाली असून हा चित्रपट गेल्या आठवडय़ात सुरू झालेल्या ‘मामि चित्रपट महोत्सवा’साठी निवडला गेला आहे. या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्याही भूमिका या चित्रपटात असून कुणाल शुक्लसह रिया नलावडे आणि अविनाश लोंढे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या २०१४ च्या पर्वात ‘बीईंग सेल्फीश’ त्यानंतर पुढील वर्षीच ‘एक्सपेरिमेंट’ अशा दोन एकांकिकेतून कुणाल शुक्ल हा तरुण प्रेक्षकांसमोर आला. त्याला मुंबई विभागातून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कारही प्राप्त झाले. अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर बनवण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या कुणाल शुक्लने दोन लघुपट दिग्दर्शित केले असून ते मामि चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले आहेत. तसेच ‘इंडिया फिल्म प्रोजेक्ट’चा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून गेल्या काही वर्षांत अनेक नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना चित्रपट आणि मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. कुणालनेही ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून थेट मनोरंजन क्षेत्रातील धुरिणांपर्यंत आपले काम पोहोचवण्याची संधी मिळते याचा पुनरुच्चार करत पुन्हा एकदा ‘लोकसत्ता’चे आभार मानले.

Story img Loader