तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने आजवर मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार दिले. नवोदित कलाकारांमध्ये आत्मविश्वासाचे बीज पेरून त्यांना व्यावसायिक क्षेत्रातील प्रवेशाची दारेही याच स्पर्धेमुळे खुली झाली आहेत. नाशिकची सिद्धी बोरसे आणि नागपूरची निकिता ढाकूलकर यांनीही लोकांकिकाच्या मंचावरील अनुभव आणि संधीचे सार्थक करत लेखन – दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध केले आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा दर्जा आणि या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्यांना इतरत्र मिळणाऱ्या संधी, याविषयी ऐकून होते. याचा अनुभव स्वत:ला आल्यावर जे ऐकले होते ते वास्तव होते, याची खात्री पटली. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या महाविद्यालयांसाठी आयोजित होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत मी गेल्या वर्षी नाशिकच्या भि. य. क्ष. महाविद्यालयातून सहभाग घेतला. महाविद्यालयाने त्यासाठी ‘पाहिजे म्हणजे पाहिजे’ या एकांकिकेची निवड केली होती. या स्पर्धेच्या वेगळेपणाचा अनुभव प्रवेशिका सादर केल्यापासून आला. तालमींना सुरुवात केल्यापासून आयोजकांकडून काय हवे, काही अडचणी आहेत का, याविषयी चौकशी करण्यात येत होती. अशा उत्साहवर्धक वातावरणात प्रत्यक्ष सादरीकरण करताना खऱ्या अर्थाने एकांकिका अनुभवता आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित प्रसिद्ध नाटय़ लेखक दत्ता पाटील यांनी केलेले मार्गदर्शन  पुढील वाटचालीत खूपच मार्गदर्शक ठरले. त्यांनी अगदी सहजसोप्या पद्धतीने एकांकिका म्हणजे काय, सादरीकरणात काय कमतरता राहिली, अजून काय करता आले असते, हे निदर्शनास आणून दिले. अभिनेते चिन्मय उदगीरकर यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. त्यांनी नाटक आणि मालिका यातील फरक, नाटकाचा पडदा कसा महत्त्वाचा आहे, कलाकार म्हणून रंगमंच कसा महत्त्वाचा  ठरतो, यासह बारीकसारीक गोष्टींविषयी मार्गदर्शन केले. जे अनेक वर्षांपासून रंगभूमीवर काम करताहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन होणे, आमच्यासाठी बहुमूल्य होते.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
प्रज्ञावंतांना ऊर्जा देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे नवे पर्व

हेही वाचा >>>छोटा पडदा गाजवणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ला १० वर्ष पूर्ण! प्राजक्ता माळी म्हणाली, “महाराष्ट्रातील सगळ्या पोरींना…”

लोकांकिका स्पर्धा माझ्यासाठी खूपच फायदेशीर ठरली. या स्पर्धेत काम करण्याचा कसा फायदा होतो, याचा अनुभव येण्यास अधिक दिवस थांबावे लागले नाही. चिन्मय उदगीरकर यांनी त्यांच्या ‘योगेश्वर जयशंकर’ या मालिकेत काम करण्याची संधी दिली. त्यानंतर राज्य शासनाच्या संस्कृत नाटय़ स्पर्धेत ‘आलम्ब’ या नाटकात काम केले. या नाटकातील कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही मिळाले. राज्य मराठी नाटय़ स्पर्धेत ‘कावळय़ाचं घर शेणाचं’ या नाटकातून सहभाग घेतला. लोकांकिका स्पर्धेत मिळालेले मार्गदर्शन आणि अनुभवामुळे हे सर्व करता आले.

नाटकांमध्ये यापुढेही काम करण्याचा विचार आहे. परंतु, त्याआधी एमबीएची पदवी प्राप्त करायची आहे. एमबीए झाल्यावर नोकरी मिळाल्यास आर्थिक स्थैर्य मिळेल. त्यामुळे पुढे नाटकाची आवड जोपासता येईल. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत काम करण्यामुळे मिळालेली ओळख पुढील वाटचालीत नक्कीच कामास येते, हा अनुभव मला आला. अर्थात, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतरांनाही तो येतच असणार. – सिद्धी बोरसे (कलाकार, नाशिक)

‘लोकसत्ताच्या व्यासपीठाने ओळख दिली’

करोनानंतर दोन वर्षांनी मागच्या वर्षी लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा होईल याची कल्पना होती. त्यासाठी सध्या वर्तमान परिस्थितीवर बोलकी एकांकिका लिहावी हा विचार मनात केला आणि ‘न्यायालयात जाणारा प्राणी’ने जन्म घेतला. नाटक लिहून झाले होते तरी लोकांकिका स्पर्धेच्या घोषणेची आम्ही वाट बघत होतो. तोवर नोव्हेंबर उजाडला. मुळात या एकांकिकेची संहिता वेगळी होती. तालमी उशिरा सुरू झाल्या, तरी प्राथमिक फेरीत पहिल्यांदा नाटक सादर करून आम्ही यशस्वी ठरलो. संपूर्ण नाटक एका छोटय़ा रंगमंचावर बसवले असल्याने कलाकारांना जड जात होते, मात्र एकही कलाकार या छोटय़ा रंगमंचाच्या खाली उतरणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी इवल्याशा जागेतील खेळ खेळलो. यातून आमची तयारी झाली. शेवटच्या दिवशी काही चुका आमच्या लक्षात आल्या. अशा अनेक गोष्टींमधून शिकत गेलो. यंदा होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत आम्ही म्हणजे नागपूरचे विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय सहभागी होणार आहोत. या वेळी एकांकिकेची संहिता नवीन आणि वेगळी आहे. आम्ही खूप उत्साही आहोत यंदाच्या स्पर्धेसाठी. लोकसत्ता लोकांकिका ही एक अशी स्पर्धा आहे की आम्ही त्याची वर्षभर वाट बघत असतो. या स्पर्धेतून आमच्यासारख्या लेखक आणि दिग्दर्शकांना प्रेरणा मिळत असते. मला तर लोकसत्ताच्या या व्यासपीठामुळे ओळख मिळाली. याचा फायदा मला व्यावसायिक नाटकात होतो आहे. ‘लोकसत्ता’मुळे लोक ओळखू लागल्याने आता अनेक ठिकाणी बोलावले जाते. व्यावसायिक नाटकांची कामं मिळू लागली आहेत. त्यामुळे लोकसत्ता लोकांकिकाचे आभार मानावेत तितके कमी आहेत. – निकिता ढाकूलकर, लेखिका – दिग्दर्शिका

Story img Loader