आपण कितीही विज्ञानवादी आणि विवेकवादी असलो तरी अजूनही सृष्टीतील किंवा मानवी जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला झालेलं नाहीए. त्याबद्दल आपण सद्या: ज्ञात माहितीपुरतीच विधानं करू शकतो. अनेक गोष्टींचा खुलासा किंवा संपूर्ण ज्ञान अजूनही आपल्याला व्हायचंय. त्याबद्दल आपण चाचपडतोच आहोत. उदा. अंतराळातील अथांग विश्व, कॅन्सरवरील अक्सीर इलाज, मानवाचा मृत्यू इत्यादी. याहीपलीकडे अनेक गोष्टी अशा असू शकतात, की ज्या आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडच्या किंवा आजघडीला आपल्या गावीही नसाव्यात. रात्रीच्या चांदण्यात कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेल्या एखाद्या ताऱ्याचा प्रकाश आपल्याला दिसत असला तरी तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो विशिष्ट तारा आधी कधीतरी नष्टही झालेला असू शकतो. किंवा आपल्यापासून अनेक प्रकाशवर्षे दूर असलेल्या एखाद्या ग्रहावर पृथ्वीचा प्रकाश दिसत असला तरी तिथेही पृथ्वीवरील साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीचा प्रकाश आत्ता पोहोचत नसेल कशावरून? म्हणजे तिथे शिवाजीमहाराजांचा जन्म होण्याअगोदरचा पृथ्वीचा प्रकाश पोहोचत असू शकतो. म्हणजे ते आपल्याकडील काळाच्या कितीतरी मागे आहेत असं म्हणायचं का? असो. जोवर अंतराळविश्वाचं संपूर्ण ज्ञान आपल्याला होत नाही तोवर सध्यातरी आपल्यासाठी हा सगळा भास-आभासांचा, तर्काचा खेळ आहे असंच म्हणावं लागेल. मग माणसाला कधी कधी होणारे भास-आभास अंधश्रद्धेच्या चौकटीत टाकून आपण जे मोकळे होतो त्यालाही विज्ञान किंवा तर्काचा काही आधार आहे/ असतो का? की आपल्या विवेकवादी मूल्यकल्पनांची ती एक उपपत्ती आहे? लाखो वर्षं मानव या सगळ्याबद्दल सतत चिंतन, मनन करत आलेला आहे. त्यातूनच त्याचा सर्वांगीण विकास होत आलेला आहे… त्यातूून तो पुढे पुढे जात आहे. नवनवे शोध त्याला आपल्या भोवतालाबद्दल, अनेक अज्ञात गोष्टींबद्दल सजग करत आहेत… ज्ञानी बनवीत आहेत. मानवाला वाटणारी अज्ञाताबद्दलची भीती ही त्याच्या सनातन अज्ञानातूनच प्रसवत असते. त्यामुळे तो भयभीत होतो. त्याला भास-आभास होत राहतात; ज्यांची तर्कशुद्ध उत्तरं त्याच्यापाशी नसतात. विज्ञानवादी अशांना अंधश्रद्ध म्हणून मोडीत काढतात. पण अशा भयगंडाने पछाडलेल्या माणसाला ताळ्यावर आणणं तितकंच अवघड असतं. मानसशास्त्राच्या आधारे त्यांच्यावर काही अंशी उपचार होऊ शकतात. पण तरी अनेक माणसं या भयगंडाने वेडीदेखील होतात. अशाच एका स्त्रीची- ऋतिकाची गोष्ट नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी…’ या नाटकात पाहायला मिळते.

शहर सोडून पाचगणीला आपल्या लहानग्या बाळासह ऋतिका आणि केतन वास्तव्यास आलेले असतात. एका ख्रिाश्चन विधवा स्त्रीचा तो बंगला असतो. केतन आपल्याला राहण्यायोग्य अशा त्यात सुधारणा करतो. पण ऋतिकाला ते फारसं आवडलेलं नसतं. किंबहुना इथे येणंच तिला मुळात आवडलेलं नसतं. ती तसं केतनला सांगतेही. पण तो तिचं काही ऐकत नाही. नंतर केतन कामानिमित्त स्पिती व्हॅलीला जातो. ती घरात एकटीच राहते. आणि यादरम्यान ऋतिकाला काही भास व्हायला सुरुवात होते. कुणीतरी बाळाच्या खोलीत रात्री येत असल्याची चाहुल तिला लागते. पण त्या खोलीत गेल्यावर मात्र तिथे तिला तसलं काहीच आढळत नाही. दररोज रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनीच तिला हे भास होत राहतात. ती भयंकर घाबरते. अशात केतन परततो. त्यांचे मित्र सोनाली आणि दुर्गेश याचवेळी त्यांच्याकडे भेटायला येतात. त्यांच्या हजेरीतही ऋतिकाला होणारे भास काही थांबत नाहीत. केतन विज्ञानवादी असल्याने तो तिचं म्हणणं उडवून लावतो. पण ऋतिका ते मानायला तयार नसते. आजूबाजूला जंगल असल्याने तरसांचा तो आवाज असू शकतो असं केतनचं म्हणणं पडतं. दुर्गेशला मात्र ऋतिकाचं म्हणणं पटतं. तो अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा असतो. सोनाली मानसोपचारतज्ज्ञ असल्याने ती केतनचीच बाजू घेते. आणि त्या रात्री ऋतिका त्यांना आपल्याकडेच थांबायला सांगते; जेणेकरून तेसुद्धा तिला आलेला अनुभव घेऊ शकतील.

zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो

त्या रात्री काय होतं? ऋतिकाचं म्हणणं खरं ठरतं का? की केतन म्हणतो तसे तिला नको ते भास उगीचच होत असतात? या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटक पाहून मिळवणंच योग्य ठरेल.

नीरज शिरवईकर यांनी डॅनी रॉबिन्सन यांच्या मूळ संकल्पनेवरील हे भारतीय परिवेशातील नाटक लिहिलं आहे. पण यातील भास-आभासांचा खेळ इतका ताणला गेला आहे की, यातली पात्रं तेच ते बराच काळ बोलत राहतात. केतनचे मुद्देही तेच ते असतात. नाटक फिरून फिरून त्याच एका ठिकाणी सतत येत राहतं. त्यामुळे प्रेक्षकांना चमत्कारिक संवादांत गुंतवून ठेवणं एवढाच मार्ग लेखकाकडे शिल्लक राहतो. तो त्यांनी वापरलाही आहे. पण तरीही नाटक पुढे सरकत नाही. नाटकात शेवटचा झटका मात्र अनपेक्षित आहे. त्याची संगती आधीच्या घटनांशी लावायची झाली तर अनेक प्रश्न उभे राहतात. म्हणजे ऋतिकाला जे भास होतात, ते स्वीकारार्ह धरले तरी दुर्गेश आणि सोनालीलाही तेच आणि तसेच भास होतात का, हा कळीचा प्रश्न त्यातून उद्भवतो. तरच शेवटची कलाटणी ग्राह्य धरता येईल. केतनचं अस्तित्व त्यांनीही अनुभवलेलं असतं. ते मग काय असतं? किमान मानसोपचारतज्ज्ञ असलेली सोनाली तरी त्यातून वेगळी ठरायला हवी ना! पण या प्रश्नांची उत्तरं न देताच नाटक संपतं. नीरज शिरवईकरांना त्यांच्या आधीच्या नाटकांत नाटकाचं क्राफ्ट अचूक सापडलंय असं वाटत असतानाच यात मात्र त्यांना दिशा सापडलेली नाहीए. नाटकात तेच ते परत परत आपल्यावर आंदोळत राहतं…. शेवटचा धक्का सोडून! या अर्थी हे नाटक फसलंय म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकात भयाचा माहोल वगळता काय पाहिलं असा प्रश्न पडतो. शेवटाची तर्कसंगतता नाटकभर दिसून येत नाही. ती ऋतिकापुरतीच मर्यादित असती तर ठीक म्हणता आलं असतं. नाटकात काहीच घडत नाही. जे पुढे घडणार आहे त्याचं सूचनही कुठं अधेेमधे येत नाही. केवळ संवाद चमत्कृती आणि वातावरणनिर्मिती वगळता नाटकात दुसरं काहीही नाही. त्यातही गोल गोल फिरणंच दिसतं. शेवटची कलाटणी सोडता नाटक बिलकूल धरून ठेवत नाही. भय अस्तित्वात असलंच तर त्याचा कार्यकारणभावही नीटपणे यायला हवा ना! असो.

नीरज शिरवईकरांनी नेेपथ्यातूून पाचगणीतील बंगली छान उभारलीय. जितेंद्र जोशी यांच्या वातावरणनिर्मिती करणाऱ्या गीतांना अजित परब यांनी उचित चाल दिली आहे. पार्श्वसंगीतात निरनिराळ्या ध्वनींच्या योजनेतूून नाटकाला पोषक मूड्स त्यांनी निर्माण केले आहेत. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून त्यास दुजोरा दिला आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि संदीप नगरकर आणि प्रदीप दर्णे यांची रंगभूषा पात्रांना बाह्य व्यक्तिमत्त्व प्रदान करतात.

गौतमी देशपांडे यांनी सततच्या आभासांनी भेदरलेली, त्यावर विश्वास असलेली ऋतिका आक्रसलेल्या अवस्थेनिशी साकारली आहे. केतनच्या तार्किक म्हणण्याशी ती आपल्याला आलेल्या अनुभवांमुळे सहमत होत नाही. केतन झालेले अनिकेत विश्वासराव आपलं तर्कशुद्ध म्हणणं वारंवार मांडत राहतात, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. पण ते लहानग्या बाळाला वेगळ्या खोलीत ठेवण्यासंबंधात जे मत मांडतात, ते भारतीय संस्कृतीत पटण्याजोगं नाही. ती पाश्चात्य संस्कृतीची देण आहे. रसिका सुनील सोनालीच्या भूमिकेत मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काही वेळा विज्ञानवादी विचार मांडतात. पण काही वेळा जुन्या, अंधश्रद्ध विचारांच्या दुर्गेशचं म्हणणंही तिला पटतं. यातली तर्कसंगती लागत नाही. दुर्गेशच्या भूमिकेत तोंडाळ, असंस्कृत बोलणारे प्रियदर्शन जाधव आपल्या वेगळेपणाने उठून दिसतात. त्यांचा वावर बिनधास्त आहे.

एकुणात, आडात फारसं काही नसल्याने शेवटचा धक्का सोडला तर नाटक प्रेक्षकांना धरून ठेवणं कठीणच.

Story img Loader