पन्नाशीनंतर जोडीदाराच्या पश्चात आयुष्य निभावणं अनेकांना जड जाऊ लागतं. आयुष्याच्या मावळतीकडचा झुकाव, मुलांचं स्वतंत्र विश्व निर्माण झालेलं असणं, निवृत्तीपश्चात काय करायचं याचं आधी न केलेलं नियोजन, तशात जोडीदाराचा वियोग अशा चहुकडून कोसळलेल्या परिस्थितीत अनेक जण एकाकीपण आणि रिकामपणाचा खायला उठणारा वेळ अंगावर येऊन खचत जातात. आयुष्याच्या या जीवघेण्या पोकळीत जगणं असह्य झाल्यानं ते नव्या जोडीदाराची (कम्पॅनिअन) अपेक्षा धरतात. किमान त्यामुळे तरी आपल्या आयुष्याला काहीएक अर्थ येईल असं त्यांना वाटतं. हे गैर, अनैतिक आहे अशातलाही भाग नाही. पण तशी संधी वा हिंमत सगळ्यांनाच लाभते असंही नाही. मग आयुष्य रडतखडत ढकलणं नशिबी येतं. काही जण नव्यानं डाव मांडतात. त्यात ते यशस्वी होतात- न होतात, हा भाग वेगळा. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकरांनी म्हातारपणाकडे झुकलेल्यांची ही समस्या आपल्या नव्या नाटकात- ‘स्थळ आले धावून!’मध्ये हसतखेळत मांडली आहे. खरं तर ही समस्या नवीन मुळीच नाही, किंवा याआधी ती कधी मांडली गेलेली नाही अशातलाही भाग नाही. परंतु तरीही एका वेगळ्या कोनातून त्याकडे पाहावं असं लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांना वाटल्याने त्यांनी या नाटकाचा घाट घातला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा