माणसाचं वय वाढत जातं तसतसं त्याची गात्रं थकत जातात. मेंदूवरचं नियंत्रण हळूहळू सुटत जातं. काहींच्या बाबतीत तर स्मृतीवरही परिणाम होतो. मागच्या-पुढच्या गोष्टी आठवेनाशा होतात. कधी कधी तर त्या माणसाला काहीच आठवेनासं होतं. त्याला स्वत:चीही शुद्ध राहत नाही. अशावेळी त्या माणसाला स्वत:ला तर ते भयंकर जाचक असतंच, पण त्याच्या अवतीभोवती सतत वावरणाऱ्या माणसांनादेखील ते विलक्षण जड जातं. त्या माणसाचं अस्तित्व जिवंत असून नसल्यासारखंच होतं. आणि हे असं किती काळ चालणार हेही कुणाला माहीत नसतं. या आजारात सगळ्यांचंच जिणं कष्टप्रद होतं. बरं, यातून सुटण्याचा मार्गही नसतो. असं आयुष्य वाट्याला येणाऱ्यांच्या प्रती फक्त सहानुभूती व्यक्त करण्याशिवाय इतर लोक काहीच करूही शकत नाहीत. हे सारं भयंकर जीवघेणं असतं. म्हणूनच कदाचित या विषयावरच्या कलाकृतीही फारशा वाचायला, पाहायला मिळत नाहीत. क्वचितच कुणीतरी हा विषय हाताळतो. ते वाचणं किंवा पाहणंही अत्यंत त्रासदायक असतं. लेखक संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका अमृता सुभाष यांनी मात्र हे धाडस ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकाच्या मंचनाने केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा