एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पडछायेत आयुष्य कंठणाऱ्यांना आपणही वटवृक्षाचा अविभाज्य भाग आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात ते तसं असणं यांत जमीन-अस्मानाचं अंतर असतं. अशा दिवास्वप्नात वावरणाऱ्यांकडे समाजही उपेक्षेनं पाहतो. त्यांची हुर्रे उडवतो.पण आपल्या आभासी जगात वावरणाऱ्यांना त्याची कधी जाणीवही होत नाही. आधीच्या पिढीतील कर्तृत्ववानाच्या पुण्याईवर जगू पाहणारे असे अनेक जण असतात. विशेषत: राजकारणात हे जास्तीकरून दिसून येतं. अशांचं पितळ उघडं पाडणारं नाटक वसंत कानेटकर यांनी लिहून ठेवलंय… ‘सूर्याची पिल्ले.’ १९७८ साली ते प्रथम रंगमंचावर आलं. दामू केंकरे यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यात अनेक दिग्गज कलाकार होते. त्यानंतर सुनील बर्वे यांनी आपल्या ‘हर्बेरियम’ उपक्रमात ते रंगभूमीवर पुन्हा आणलं. आणि आता दीड दशकानंतर त्यांनीच ते पुन्हा प्रतिमा कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनात मंचित केलं आहे. तीन अंकी नाटकांचा जमाना इतिहासजमा झालेला असताना त्यांनी हे धाडस केलं आहे. (तसं तर ‘चारचौघी’ हे अलीकडेच पुनरुज्जीवित झालेलं आणि यशस्वी झालेलं आणखीन एक तीन अंकी नाटक.) पण नाटक उत्तम असेल तर प्रेक्षक त्याच्या लांबी-रुंदीकडे बघत नाहीत, हेच खरं. ‘सूर्याची पिल्ले’च्या बाबतीतही ते लागू पडतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा