अभिनेत्री पल्लवी पाटील यांची डोंबिवलीतील जवाहिऱ्यांच्या दुकानांना भेट
‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेच्या निमित्ताने अभिनेत्री पल्लवी पाटील यांनी डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुलातील लागू बंधू, इंदिरा चौकातील वामन हरी पेठे, फडके रस्त्यावरील चिंतामणी ज्वेलर्स या जवाहिऱ्यांच्या दुकानांना भेट दिली.

Untitled-7
‘लोकसत्ता’आयोजित ‘सुवर्णलाभ’ योजनेला सुरुवात झाली आहे. ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनेत’सहभागी झालेल्या ज्वेलर्सच्या दुकानातून ग्राहकांनी ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ‘लकी कूपन’ दिले जाणार आहे. हे कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकायचे आहे. योजनेच्या शेवटच्या दिवशी सहभागी दुकानांमधून सर्व कुपन्स एकत्रित केली जाऊन सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध केली जाणार असून ही योजना १२ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. बक्षिसाबरोबर आनंदाची उधळण करणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेच्या निमित्ताने अभिनेत्री पल्लवी पाटील यांनी डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुलातील लागू बंधू, इंदिरा चौकातील वामन हरी पेठे, फडके रस्त्यावरील चिंतामणी ज्वेलर्स या जवाहिऱ्यांच्या दुकानांना भेटी दिल्या. तेथील व्यवस्थापनाने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दुकानातील नवीन आणि पारंपरिक अशा सर्व प्रकारच्या दागिन्यांची माहिती पाटील यांना देण्यात आली. दागिन्यांची पाहणी करण्याबरोबरच त्यांनी काही दागिने परिधान करून ते किती उठावदार व शोभिवंत दिसतात तेही पाहिले. सर्वसामान्यांना सोने खरेदीबरोबर बक्षिसांचा लाभ मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे. ‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत या योजनेला महाराष्ट्र सुवर्णलंकार महामंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. विजेत्यांना कार, परदेशी सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजना पॉवर्डबाय गुणाजी एंटरप्राइजेस, प्लॅटिनम पार्टनर-लागू बंधू, वामन हरी पेठे सन्स, गोल्ड पार्टनर- वामन हरी पेठे ज्वेलर्स, सेन्को गोल्ड अँड डायमंड, सिल्व्हर चिंतामणीज फाइन ज्वेलर्स, श्री नेमिनाथ ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, ट्रॅव्हल पार्टनर-आत्माराम परब संचालित ईशा टूर तर बँकिंग पार्टनर म्हणून ‘डीएनएस’ बँक यांचे सहकार्य लाभले आहे.