सनी लिऑन पॉर्न चित्रपट आणि सेक्सी प्रतिमेपासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. परंतु, इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधींशी अलिकडेच झालेल्या एका मुक्त संवादात सेक्सी प्रतिमेपासून फारकत घेणार नसल्याचे सनीने सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री आणि एमटीव्हीवरील स्प्लिटसव्हिलाची सूत्रसंचालक सनी लिऑनने स्प्लिटसव्हिला आणि बॉलिवूडमधील आपल्या प्रवासाविषयी संवाद साधला. आपल्या सेक्सी प्रतिमेपासून फारकत घेणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सनी म्हणाली, अशा अफवा पसरविणे हे मूर्खपणाचे आहे. प्रत्येक चित्रपटात काही प्रमाणात सेक्सिनेस हा असतोच, चित्रपटाचा तो एक भाग आहे. शाहरूख खान आणि हृतिक रोशनला मोठ्या पडद्यावर शर्ट काढताना पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडते. दीपिका पदुकोणसारख्या सुंदर अभिनेत्रींना रुपेरी पडद्यावर सेक्सी कपड्यांमध्ये पाहणे प्रेक्षकांना आवडते. मानवातील या नैसर्गिक भावनेमुळे तो याकडे आकर्षित होतो. रुपेरी पडद्यावर सेक्सी, बोल्ड आणि आकर्षक दिसणे हा मनोरंजनाचा भाग आहे. एमटीव्हीवरील स्प्लिटसव्हिला कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून टीव्हीवर पदार्पण केलेल्या सनीने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचे अनुभवदेखील शेअर केले. लवकरच सनी ‘मस्तिजादे’ या सेक्स कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2014 रोजी प्रकाशित
व्हिडिओ : चित्रपटात सेक्सी दिसणे गरजेचे – सनी लिऑन
सनी लिऑन पॉर्न चित्रपट आणि सेक्सी प्रतिमेपासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचे वृत्त अलीकडेच माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधींशी मुक्त संवाद...
First published on: 16-06-2014 at 06:38 IST
TOPICSइंडियन एक्सप्रेसIndian ExpressबॉलिवूडBollywoodसनी लिओनीSunny Leoneहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looking sexy is need of cinema sunny leone