सनी लिऑन पॉर्न चित्रपट आणि सेक्सी प्रतिमेपासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. परंतु, इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधींशी अलिकडेच झालेल्या एका मुक्त संवादात सेक्सी प्रतिमेपासून फारकत घेणार नसल्याचे सनीने सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री आणि एमटीव्हीवरील स्प्लिटसव्हिलाची सूत्रसंचालक सनी लिऑनने स्प्लिटसव्हिला आणि बॉलिवूडमधील आपल्या प्रवासाविषयी संवाद साधला. आपल्या सेक्सी प्रतिमेपासून फारकत घेणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सनी म्हणाली, अशा अफवा पसरविणे हे मूर्खपणाचे आहे. प्रत्येक चित्रपटात काही प्रमाणात सेक्सिनेस हा असतोच, चित्रपटाचा तो एक भाग आहे. शाहरूख खान आणि हृतिक रोशनला मोठ्या पडद्यावर शर्ट काढताना पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडते. दीपिका पदुकोणसारख्या सुंदर अभिनेत्रींना रुपेरी पडद्यावर सेक्सी कपड्यांमध्ये पाहणे प्रेक्षकांना आवडते. मानवातील या नैसर्गिक भावनेमुळे तो याकडे आकर्षित होतो. रुपेरी पडद्यावर सेक्सी, बोल्ड आणि आकर्षक दिसणे हा मनोरंजनाचा भाग आहे. एमटीव्हीवरील स्प्लिटसव्हिला कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून टीव्हीवर पदार्पण केलेल्या सनीने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचे अनुभवदेखील शेअर केले. लवकरच सनी ‘मस्तिजादे’ या सेक्स कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा