बॉलिवूडमध्ये एकेकाळी ‘म्युझिकल लव्हस्टोरी’ हा यशाचा बिनधोक फॉम्र्युला मानला जायचा. सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकात गाजलेला हा फॉम्र्युला २१ व्या शतकात ‘कहो ना प्यार है’, ‘वीर झारा’ असे अपवाद वगळता सिनेमातले ट्रेण्ड्स खूप बदलले. परंतु, प्रेमकथापट हा बॉलिवूडचा आवडता विषय असल्यामुळे वेगवेगळ्या काळातील तरुणाईला आवडतील असे प्रेमकथापट येतच असतात. म्हणूनच आता अवघ्या १२ कोटी रुपयांत बनलेला ‘आशिकी २’ हा नवीन स्टारकास्ट घेऊन काढलेला भट कॅम्पचा सिनेमा साधारण हिट ठरल्याने महेश भट म्हणे तिसरा आणि चौथा सीक्वेलपट तयार करण्याचा विचार करीत आहेत.
मधल्या काळात भट कॅम्पने सेक्स आणि भयपटांचा फॉम्र्युला हाताळून संगीताच्या साथीने भरपूर गल्ला गोळा केला. आता म्हणे पुन्हा जमाना बदलला असून निरागसतेच्या शोधात म्हणे सगळ्यांना आता जुन्या काळाच्या स्मृतींमध्ये रमणे आवडू लागलेय म्हणून आपण ‘आशिकी’ या गाजलेल्या म्युझिकल लव्हस्टोरीचा सीक्वेलपट काढला आहे, अशी मल्लिनाथी महेश भट यांनी केली. त्यांच्या सुदैवाने आदित्य रॉय कपूरने साकारलेला मद्यपी प्रेमिक पडद्यावर रोमान्स करताना दिसला नाही तरी नायिका श्रद्धा कपूरच्या पडद्यावरच्या वावरातून निरागसता दिसली. म्हणूनच की काय शीर्षकगीताव्यतिरिक्त गाणी फारशी चांगली नसली तरी चित्रपटाने पहिल्या आठवडाअखेर गल्लापेटीवर साधारण २०-२४ कोटीचा धंदा केल्याने हा चित्रपट म्हणे ‘हीट?’ ठरलाय. भट कॅम्पची व्यावसायिक हुशारी अशी की चित्रपट केल्यानंतर टी सीरीजवाले भूषणकुमार यांना त्यांनी वितरणाचे हक्क दिले. त्यामुळे अशाच पद्धतीने आशिकीचा आणखी तिसरा व चौथा सीक्वेलपट काढून जमेल तेवढा नफा कमाविण्याचा भट कॅम्पचा होरा दिसतोय. लव्हस्टोरीला कधी शेवट नसतो. कोणत्याही काळात प्रभावी पद्धतीने त्या त्या काळातील तरुणाईला आवडेल असे प्रेमकथापट तयार करायला काय हरकत आहे, असेही महेश भट यांनी म्हटलेय. ते काहीही असो, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही नवीन जोडी बॉलीवूडला मिळालीय. आता चित्रपटाचे निर्माते-वितरक-अर्थपुरवठा करणारे सर्वचजण नफ्यात असल्यामुळे भट कॅम्पकडून आणखी एक गाणे चित्रपटात घातले जाणार असून अधिक गल्ला गोळा करण्याची आशा त्यांना निर्माण झालीय. ‘ए’ आणि ‘यू’ प्रमाणपत्र मिळूनही म्युझिकल लव्हस्टोरी यशस्वी ठरू शकते हेही आम्ही दाखवून दिलेय, अशी पुस्तीही भट कॅम्पने जोडलीय.
भट कॅम्पचा लव्हस्टोरी फॉर्म्यूला
बॉलिवूडमध्ये एकेकाळी ‘म्युझिकल लव्हस्टोरी’ हा यशाचा बिनधोक फॉम्र्युला मानला जायचा. सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकात गाजलेला हा फॉम्र्युला २१ व्या शतकात ‘कहो ना प्यार है’, ‘वीर झारा’ असे अपवाद वगळता सिनेमातले ट्रेण्ड्स खूप बदलले. परंतु, प्रेमकथापट हा बॉलिवूडचा आवडता विषय असल्यामुळे वेगवेगळ्या काळातील तरुणाईला आवडतील असे प्रेमकथापट येतच असतात.
First published on: 02-05-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love story formula by bhat camp