शूटींगमुळे सहसा घरच्यांसोबत आम्हाला सण साजरे करण्यास मिळत नाही. त्यामुळे आमची दिवाळी ही सेटवरच साजरी केली जाते. पण यावेळी जर वेळ मिळाला तर मी माझ्या आई-बाबांसोबत डोंबिवलीला दिवाळी साजरी करणार आहे. खरतरं यावेळची दिवाळी माझ्सासाठी खूप खास आहे. माझ्या बाबांचा वाढदिवस योगायोगाने दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी आलायं. त्यामुळे त्या दिवशी खूप मज्जा येणार आहे. माझे आई-बाबा , भावंड आणि इतर नातेवाईक मिळून बाबांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे.
दिवाळीचा फराळ खायला तर मला आवडतोचं पण मला स्वयंपाक घरात जाऊन हातभार लावयलाही आवडतं. यंदा मी कामातून दोन दिवसांची सुट्टी घेतलीयं. त्यामुळे नक्कीचं यंदाच्या फराळाला आईसोबत माझाही हातभार लागेल. त्याचसोबत मी डायट वगैरे सगळ बाजूला ठेवून फराळाचा आनंद लुटणार आहे. मला तर अनारसे खायला खूप आवडतात. माझे फेव्हरेट आहेत. तर कशाचाही विचार न करता मनसोक्त अनारसे खायाचं ठरवलयं.
‘होणार सून मी ह्या घरची’च्या सेटवर सगळेचं सण साजरे केले जातात.  अगदी आंब्याच्या रसापासून आम्ही सगळ साजरं करतो.  सेटवर दिवालीलादेखील खूप धमाल केली जाईल. आमच्या मालिकेत तर किती स्त्रिया आहेत तुम्हाला माहितचं आहे. सगळ्याजणी काहीनाकाही खाण्यासाठी घेऊन येतात. त्यामुळे आमच्या मुलांची तर चंगळ होते.
शब्दांकन- चैताली गुरव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा