तो क्रिकेटविश्वातला धडाडीचा खेळाडू आणि ती बॉलिवूडमधली सौंदर्यवती, होय! बरोबर ओळखलत, हे आहे अनेकवेळा एकत्र अढळून आलेले तथाकथीत प्रेमीयुगल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. या दोघांनी आपल्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांना अद्याप प्रेमाची उपमा दिलेली नाही. आपण केवळ एकमेकांचे चांगले मित्र असून, आपल्यात तसे काही नसल्याचे सांगत लपूनछपून भेटणारी ही जोडी, आता खुलेआमपणे एकमेकांच्या हातात हात घालून बिनधास्तपणे वावरताना दृष्टीस पडत आहे. ‘आयएसएल’ क्रिकेट सामन्यादरम्यान एकत्र दिसलेली ही जोडी सोमवारी रात्री मुंबईतील एका प्रसिध्द नाईटस्पॉटमध्ये एकत्र अढळून आली. यावेळी विराट आणि अनुष्काबरोबर तिचा भाऊ करनेशदेखील उपस्थित होता. त्यांच्यात चांगलाच हास्यविनोद रंगला होता. चेहऱ्यावर सतत हास्य उमटणारी अनुष्का कमालीची आनंदी दिसत होती. आमीर खानबोबरच्या ‘पीके’ या आगामी चित्रपटामुळे अनुष्का सध्या चर्चेत आहे. विराटबरोबरच्या नाईट आऊटींगसाठी अनुष्काने प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता, तर विराटने डेनिम जिन्सवर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या अशा मनमोकळ्या वागण्याने त्यांच्यात असलेल्या तथाकथीत प्रमसंबंधांना सत्यतेच्या दृष्टीने अधिकच पुरक वातावरण मिळते. विराट आणि अनुष्काच्या पालकांनी अलिकडेच एकमेकांची भेट घेतल्याचे ऐकिवात आहे.
पाहा फोटो गॅलरी
(छाया – वरिन्दर चावला)

Story img Loader