‘बिग बॉस’ची विजेती गौहर खान आणि तिचा प्रियकर कुशाल टंडन ‘खतरोंके खिलाडी’च्या पाचव्या मोसमात एक- मेकांविरोधामध्ये उभे ठाकणार आहेत. या व्यतिरिक्त नृत्यदिग्दर्शक-अभिनेता सलमान युसूफ खान, अभिनेत्री मुग्धा गोडसे, दयानंद शेट्टी हे देखिल ‘खतरोंके खिलाडी’च्या या मोसमातील भागामध्ये सहभागी होणार आहे.
या वेळी ‘फिअर फॅक्टर: खतरोंके खिलाडी’चा विषय मुलांच्या विरूध्द मुली असा असणार आहे.
नृत्य दिग्दर्शक बास्को-कैसर ही जोडी, टीव्ही कलाकार गुरमीत चौधरी, झासी की रानी फेम कविता सेनगर, एजाझ खान, आयपीएल होस्ट रोचेल्ली मारीआ राव इत्यादींनी खतरोंके खिलाडीच्या पाचव्या मोसमत सहभाग घेण्यात रस दाखवला असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळची साहसदृष्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये चित्रितकरण्यात येणार असून, पुढील दोन महिन्यांमध्ये चित्रिकरण होणार आहे. ‘खतरोंके खिलाडी’चे प्रसारण मार्च, एप्रिलमध्ये करण्यात येणार आहे. या मोसमात ‘खतरोंके खिलाडी’ या रियालिटी गेमचे यजमानपद दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्याकडे आहे.
‘खतरोंके खिलाडी’मध्ये गौहर खान प्रियकर कुशाल टंडन विरोधात
'बिग बॉस'ची विजेती गौहर खान आणि तिचा प्रियकर कुशाल टंडन 'खतरोंके खिलाडी'च्या पाचव्या मोसमात एक- मेकांविरोधामध्ये उभे ठाकणार आहेत.
First published on: 30-01-2014 at 02:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lovers kushal tandon gauahar khan to compete against each other in khatron ke khiladi