बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक म्हणून लकी अली ओळखले जातात. ते सध्या लाइमलाइट पासून लांब असले तरी त्यांचे फोटो मात्र चर्चेत असतात. लकी अली यांचे फोटो त्यांची मैत्रीण नफीसा अली शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी गोव्यातील एक व्हिडीओ केला होता आणि तो व्हिडीओ चर्चेत होता. आता नफीसा अली यांनी लकी अली यांच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

नफीसा अली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लकी अली यांची मुलगी सारा इनारा अलीचा फोटो शेअर केला आहे. इनारा ही लकी अली यांची दुसरी मुलगी आहे. इनारा ही दिसायला अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे. नफीसा यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.

लकी अली हे बराच वेळ गोव्यामध्ये घालवताना दिसतात. गोव्यामध्ये नफीसा अली यांचे देखील घर आहे. नफीसा या तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता त्यांनी इनाराचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘ही सारा इनारा अली (माझी मित्र लकी अलीची धाकटी मुलगी)’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

हे फोटो पाहून एका यूजरने ‘सारा गाणे देखील गाते का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘किती सुंदर दिसते ही, गाणे देखील गाते का?’ असे म्हणत कमेंट केली आहे.

लकी अली यांना पाच मुलं असून त्यांनी आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. लकी यांनी शेवटचे लग्न २०१० मध्ये इंग्लडच्या कॅट हलामशी केले. सध्या ते लाइमलाइटपासून फार दूर आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ कलाकाराची इज्जत केली जात नाही. लकी यांना एकांतात राहणं फार पसंत आहे. त्यांना स्वतःहून बॉलिवूडमध्ये पुन्हा यायचे नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.