नेटफ्लिक्सवर Lust Stories चा दुसरा पार्ट शुक्रवारीच रिलिज झाला आहे. Lust या शब्दाचा अर्थ वासना असाच म्हणजेच तो शरीर संबंधाच्या आधीची भावना, तीव्र कामेच्छा या अर्थानेच घेतला जातो. मात्र या सिनेमात Lust या शब्दाचे लालसा, अभिलाषा, स्वार्थी भावना असे विविध कंगोरे लक्षात येतात आणि तेच या दुसऱ्या पार्टचं सर्वात मोठं यश आहे. मुळातच आपल्याकडे सेक्स हा विषय एक तर वर्ज्य केला जातो किंवा त्यावर बोलणं टाळलं जातं.

लस्ट आणि सेक्स याच्या पलिकडे जाणारा सिनेमा

Lust Stories 2 या सिनेमांत चार कथा आहेत. सिनेमा ढोबळमानाने सेक्स आणि लस्ट यावर भाष्य करतो. आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा या चार दिग्दर्शकांच्या चार कथा या सिनेमांमध्ये पाहण्यास मिळतात. या चार दिग्दर्शकांनी लेखनही केलं आहे त्यांना साथ लाभली आहे ती सौरभ चौधरी, ऋषी विरमानी, सौरभ चौधरी या सह लेखकांची साथ लाभली आहे. मात्र फक्त लस्ट किंवा सेक्स हाच या चार कथांमधला प्रमुख धागा नाही.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
लग्नानंतर होईलच प्रेम : नव्या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट माहितीये का? मृणाल दुसानिस अन् ज्ञानदाच्या भूमिकेविषयी जाणून घ्या…
premachi goshta yash pradhan exit from the serial
‘प्रेमाची गोष्ट’मधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ कलाकार, मालिकेत आहे मोठा ट्विस्ट
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार

सिनेमाच्या चार कथा काय? थोडक्यात…

पहिली कथा

पहिली कथा आहे अंगद बेदी, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता यांच्यावर चित्रित केलेली. दोन कुटुंब एकत्र येतात आणि आपल्या मुलांचं लग्न लावून देऊ इच्छित असतात. त्याचवेळी पत्रिका जुळण्यापेक्षा एकमेकांचे सूर जुळणं किती महत्त्वाचं आहे. शरीर संबंध हे नात्यांचा आधार कसा ठरतात हे कुटुंब प्रमुख असलेली आजी (नीना गुप्ता ) समाजवून सांगते. स्त्री पुरुषांचे लैंगिक संबंध हा विषय आपल्याकडे अजूनही खुलेपणाने बोलला जात नाही. तो त्याकडे मोकळेपणाने बघितलं जात नाही ते बघणं किती आवश्यक आहे यावर ही कथा प्रकाश टाकते. आजी ही जुन्या पिढीची दाखवली आहे पण तिचे विचार मॉडर्न. या रोलमध्ये नीना गुप्ता भाव खाऊन गेली आहे. अंगद बेदी आणि मृणाल ठाकूर लग्न करतात का? त्यांचं काय होतं हे पाहण्यासाठी सिनेमा बघावा लागेल.

दुसरी कथा

दुसरी कथा आहे घरात एकट्या राहणाऱ्या एका उच्चभ्रू बाईची. तिच्या घरी तिची कामवाली बाई येत असते. एकट्या राहणाऱ्या उच्चभ्रू बाईची भूमिका तिलोत्तमा शोमने साकारली आहे. तिला सातत्याने अर्धशिशीचा त्रास होत असतो. ती एक दिवस ऑफिसमधून लवकर घरी येते आणि हळूच आपल्या घराचा दरवाजा उघडते. त्यानंतर तिचं अगदी सहज आरशाकडे लक्ष जातं ते पाहून ती चकीत होते. त्यानंतर काय घडतं? हे खूप रंजक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. या कथेत संवाद कमी आहेत मात्र जे संवाद आहेत ते अत्यंत प्रभावी झाले आहेत. अमृता सुभाष आणि तिलोत्तमा शोम या दोघीही भाव खाऊन गेल्या आहेत.

तिसरी कथा

या श्रृंखलेतली तिसरी कथा आहे तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची. विजय वर्मा हा कारने एके ठिकाणी जात असतो. एका फोनवर एका मुलीला डेट करत असतो. तेवढ्यात त्याला बायकोचा आणि मुलाचा फोन येतो. डेट करणाऱ्या मुलीचा फोन विजय वर्मा कट करतो. बायको आणि मुलाशी बोलून झाल्यावर पुन्हा तो मुलीला डेट करु लागतो.. तेवढ्यात एक घटना घडते. त्यानंतर तो जिथे पोहचतो तिकडे त्याला तमन्ना दिसते. तिला पाहून तो चकीत होतो.. ती त्याची बायको असते. पण पुढे काय घडतं? विजय वर्मा आणि तमन्ना यांची ही स्टोरी आपल्या कल्पनेच्याही पलिकडची आहे. धक्कातंत्राचा जबरदस्त वापर या कथेत करण्यात आला आहे.

चौथी कथा

चौथी कथा आहे काजोल आणि कुमुद मिश्रा यांच्यातली. कुमुद मिश्राने एका राजाची भूमिका साकारली आहे. पण हा नावापुरताच ‘हुकूम’ आहे. एरवी रंगेल, स्त्रीला भोगणारा लंपट, स्त्रीला उपभोग्य समजण्याची मानसिकता असलेला पुरुष आहे. काजोलने अत्यंत सोशिक आणि नवऱ्याचा हिंसाचार सहन करणारी, रोज लैंगिक छळ करणारी बायको साकारली आहे. या भूमिकेत काजोलचं कास्टिंग अगदी परफेक्ट आहे. कुमुद मिश्रानेही त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. आपल्याला त्याचा तिरस्कार वाटू लागतो हीच त्याच्या अभिनयाची पावती आहे. या कथेच्या सुरुवातीलाच काजोल एका झुरळाला घाबरुन जोरात ओरडते असा एक सीन आहे. दुसऱ्याच क्षणी ती एका काचेच्या वाटीखाली झुरळ पकडते, त्याला चिरडते. या सीनमध्ये तिने जे हावभाव दिले आहेत त्याला जवाब नाही. ही कथा बाईच्या लैंगिक छळावर भाष्य करते. त्या छळाला कंटाळलेली बाई काय करु शकते आणि प्रत्यक्षात काय घडतं? हे पाहण्यासारखं आहे. या कथेलाही एक ट्विस्ट देण्यात आला आहे तो पाहून आपण चक्रावून जातो.

भय, लालसा, आश्चर्य, दया, करुणा, कीव असे सगळे रस या चार कथांमध्ये पाहण्यास मिळतात. कलाकारांचं त्या त्या जागी कास्टिंग परफेक्ट आहे. चार वैविध्यपूर्ण कथांचा ‘लस्ट स्टोरी 2’ उत्तम आहे. फ्रेमवर्क, कॅमेरावर्क, अभिनय याबाबतीतही उजवा आहे. संवादही सुंदर आहेत. अमृता सुभाष आणि तिलोत्तमा शोम या दोघी एकमेकींना भाजीच्या गाडीवर भेटतात तो सीन सुंदर झालाय. तसंच विजय वर्मा जेव्हा तमन्नाच्या घरात असतो तेव्हा कथेत जो ट्विस्ट येतो आणि ती संपताना जो येतो तो अगदी अनेपिक्षत आहे. बाकी सिनेमा कुठेही कंटाळवणा आणि का पाहतोय हा प्रश्न पडणारा ठरत नाही. चारही कथा फक्त वासनाच नाही तर मानवी मनातल्या विविध भावनांशी जोडला गेला आहे. यात सिनेमातली मला सर्वाधिक आवडलेली कथा आहे ती तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची. या सिनेमाला रेटिंग द्यायचं असेल तर पाच पैकी मी देईन साडेचार स्टार! पहिल्या भागापेक्षा लस्ट स्टोरीचा दुसरा भाग दमदार आणि शानदार झालाय यात शंका नाही.

sameer.jawale@loksatta.com