मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करून तिने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रिया बापट ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असते. नुकतंच प्रिया बापटने तिच्या आयुष्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

प्रिया बापटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. प्रिया बापट ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिची ही स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला डंपरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच

“आपण इतरांपेक्षा चांगले आहोत हे सिद्ध करण्यात इतके गुंतलेलो असतो की आपल्यात एक वेगळी जादू आहे हेच आपण विसरतो. यश असो किंवा अपयश यातील प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच जादू असते. तुमच्याकडे पैसे कमी असतील तरी एकवेळ चालेल. पण त्यात तुम्ही आनंदी नसाल तर त्याला काही अर्थच नाही. तुम्ही कृतज्ञ आणि समाधानी नसाल तर त्याला अर्थच नसतो.

अनेक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो, गंमत असते हेच कधी कधी विसरतो. हातात हात घेणे, घट्ट मिठी मारणे आणि आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीशी बोलणे यातूनही आपल्याला सहज आनंद मिळतो. एखाद्या भौतिक यशात गुंतून पडण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर प्रेम करा आणि इतरांवर प्रेम करा, हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वतःशी देखील दयाळू राहा”, अशी पोस्ट प्रिया बापटने केली आहे.

आणखी वाचा : नवं हॉटेल, आठवड्यापूर्वी वाढदिवस अन् डंपरची धडक; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल? व्हिडीओ चर्चेत

दरम्यान प्रिया बापटने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या प्रिया बापट ही नाटकात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे, अशी चर्चाही रंगली आहे.