दिग्दर्शक निशिकांत कामत याच्या बहुप्रतिक्षीत ‘मदारी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटात अभिनेता इरफान खान पुन्हा एकदा आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज झाला आहे. इरफान खान चित्रपटात एका सामान्य व्यक्तीची भूमिका साकारत असल्याचे दिसून येते. त्याच्या मुलाचा एका अपघातात मृत्यू होतो आणि त्यासाठी तो गृहमंत्र्यांना जबाबदार धरतो. मग अद्दल घडविण्यासाठी गृहमंत्र्याच्या मुलाचेच तो अपहरण करतो आणि येथूनच कहाणीचा रोमांच ट्रेलरमध्ये अनुभवायला मिळत आहे. आशयघन संवाद, इरफानचा दमदार अभिनय आणि रोमांच नजराणा ट्रेलरमध्ये आहे. चित्रपटात अभिनेता जिमी शेरगिल याने पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, मदारी चित्रपटाची कहाणी एका सत्यघटनेवर आधारीत असल्याचे सांगितले जात असून, मुंबईत अंधेरी-कुर्ला रोडवर मेट्रो ब्रिजचे बांधकाम सुरू असताना झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. चित्रपट १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा