‘तनु वेड्स मनु’ चित्रपटात मुख्य भूमिका करणारे आर माधवन आणि कंगना रणावत पुन्हा एकदा चित्रपटाच्या सिक्वलसाठी एकत्र काम करणार आहेत. मुळ चित्रपटात माधवनने अनिवासी भारतीयाची तर कंगनाने उत्तर प्रदेशमधील एका मुलीची भूमिका केली होती.या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये इमरान खान आणि अनुष्का शर्मा भूमिका करणार असल्याची चर्चा होती. मात्र, दिग्दर्शक आनंद रायने यास नाकारले असून सिक्वलमध्ये माधवन आणि कंगना हेच मुख्य भूमिका करणार असल्याचे सांगितले. राय म्हणाला की, मी सध्या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करत असून ते कधी पूर्णत्वास येईल हे सांगता येणार नाही. जर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर त्यात माधवन आणि कंगना हेच मुख्य भूमिका करतील. त्यांच्याविना चित्रपटाचा सिक्वल हा अपूर्ण आहे.

Story img Loader