दिग्दर्शक मधुर भांडारकर हा बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. वैविध्यपूर्ण विषयांवर तो चित्रपट बनवत असतो. तर आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘बबली बाउन्सर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर करत आहेत. दरम्यान, यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या दोघांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

आणखी वाचा : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, तिकिटाच्या दरात मिळणार मोठी सवलत

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

नुकतेच तमन्ना भाटिया आणि मधुर भांडारकरने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात दोघेही गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना तमन्ना भाटियाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर मधुर भांडारकर पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करून दर्शनासाठी गेला होता. तसेच दोघांच्याही कपाळावर कुंकु लावलेले दिसत आहे. तमन्ना-मधुरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिवाय चाहतेही यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : ‘द फेम गेम’ सिरीजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार नाही; कारण…

मधुर आणि तमन्नाचा ‘बबली बाउन्सर’ हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया या चित्रपटाच्या माध्यमातून मधुर भांडारकरसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. तेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या यशासाठी मधुर भांडारकर आणि तमन्ना भाटिया लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र आले. यावेळी या दोघांची देवाबद्दल असलेली श्रद्धा पाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. डिस्नी + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाशिवाय सौरभ शुक्ला, अभिषेक बजाज आणि साहिल वैद यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader