राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या महत्त्वाकांक्षी ‘कॅलेंडर गर्ल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अर्धा टप्पा यशस्वीरित्या चित्रीत करण्यात आल्याचे ट्विट खुद्द भांडारकर यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच या वर्षाच्या जुलै महिन्यात सुरू करण्यात आले आहे आणि केवळ ४० दिवसांत चित्रीकरण पूर्ण करण्याचा मानस मधुर भांडारकर यांचा आहे. त्यादृष्टीने योग्य प्रयत्न सुरू असल्याचे भांडारकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नेमक्या १० वर्षांपूर्वी २००४ साली नव्या चेहऱयांना घेऊन ‘पेज-३’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि आज दहावर्षांनंतर पुन्हा पाच नव्या चेहऱयांसह ‘कॅलेंडर गर्ल्स’ चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याचे ट्विट भांडारकरांनी केले आहे.
‘कॅलेंडर गर्ल्स’ चित्रपटासाठी त्यांनी पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. चित्रपटाची कथा मॉडेल्सच्या अवतीभोवती फिरते. एका प्रसिद्ध कॅलेंडरवर त्यांचे छायाचित्र छापून आल्यानंतर त्या अचानक प्रसिद्धीच्या झोतात येतात आणि त्यापुढे घडत जाणाऱया रंजक गोष्टी असे या चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चित्रपटातील या पाच नव्या चेहऱयांबाबत आतापर्यंत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या चेहऱयांची ओळख चित्रपटाच्या ट्रेलरमधून केली जाईल अशी शक्यता आहे.
‘कॅलेंडर गर्ल्स’च्या चित्रीकरणाचा अर्धा टप्पा यशस्वी
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या महत्त्वाकांक्षी 'कॅलेंडर गर्ल्स' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अर्धा टप्पा यशस्वीरित्या चित्रीत करण्यात आल्याचे ट्विट खुद्द भांडारकर यांनी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2014 at 05:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhur bhandarkar cans fifty percent of calendar girls