चित्रपट निर्माता मधुर भांडारकर त्याच्या आगामी चित्रपटासाठी बंगाली साहित्याचा अभ्यास करण्यास उत्सुक आहे. ‘चांदनी बार’ दिग्दर्शक मधुरने बंगाली चित्रपट निर्माता रित्विक घातक याच्याकडून प्रेरणा घेत त्याचे कौतुक केले आहे. ‘ संवेदनशील बंगाली विविध कलांचा मी एक महान प्रशंसक असून मी बंगाली साहित्यावर चित्रपट करण्याची शक्यता आहे’, असे मधुर म्हणाला.
वास्तववादी आणि पडद्यामागील दृश्ये चित्रपटातून दाखविणे हे त्याचे विशेष गुण आहेत. त्याचा ‘पेज ३’ हा चित्रपट पाहिल्यानंतर बहुतेकांनी पेज ३ पार्टीजला जाणे बंद केले आहे. ‘कॉर्पोरेट’नंतर मी एक अभियान सुरु केले होते, त्यावरुन टीका करण्यात आली. पण माझ्या कामावर मी नेहमीच ठाम राहिलो. आम्ही आमच्या चित्रपटातून पाशवी सत्य दाखवू नये? असे तो म्हणाला.

Story img Loader