सत्य घटना आणि समाजाशी निगडीत विषयांवर चित्रपट बनविण्यास प्रसिद्ध असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधुर भांडारकर आता लव्ह स्टोरी करणार आहे. मी एक वास्तववादी आणि रोमॅण्टिक म्युझिकल चित्रपट करण्याचा विचार करत आहे, असे मधुर भांडारकर म्हणाला. चांदनी बार, पेज ३, फॅशन या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला भांडारकर प्रेमकथा करणे हे आपल्यासाठी आव्हान आहे असे म्हणतो.
मधुर भांडारकर म्हणाला की, आतापर्यंत त्याने तेच चित्रपट बनविले जे तो बनवू इच्छित होता. जर चांगली स्क्रिप्ट मिळाली तर टेलिव्हिजनवरही दिग्दर्शन करण्याची इच्छा असल्याचेदेखील तो म्हणाला. ‘चांदनी बार’ आणि ‘फॅशन’च्या सिक्वलबाबत विचारले असता मधुर म्हणाला, चांदनी बारचा सिक्वल करण्याची माझी इच्छा नाही आणि फॅशनचा सिक्वल होऊ शकेल असे मला वाटत नाही. जर चित्रपट एखादा मोठा संदेश देत असेल तर त्यामुळे प्रेक्षक विचार करण्यास प्रवृत्त झाले पाहिजेत ही खरी गरज असल्याचे मधुर म्हणाला.
मधुर भांडारकर बनवणार ‘म्युझिकल लव्ह स्टोरी’
सत्य घटना आणि समाजाशी निगडीत विषयांवर चित्रपट बनविण्यास प्रसिद्ध असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधुर भांडारकर आता लव्ह स्टोरी करणार आहे. मी एक वास्तववादी आणि रोमॅण्टिक म्युझिकल चित्रपट करण्याचा विचार करत आहे, असे मधुर भांडारकर म्हणाला. चांदनी बार, पेज ३, फॅशन या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला भांडारकर प्रेमकथा करणे हे आपल्यासाठी आव्हान आहे असे म्हणतो.
First published on: 28-06-2013 at 01:48 IST
TOPICSफॅशनFashionबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhur bhandarkar wants to make a love story