छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण यावेळी मधुराणी एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. मधुराणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे मधुराणी चर्चेत आली आहे.
मधुराणीने तिच्या मुलीचा म्हणजेच स्वरालीच्या वाढदिवसासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता मधुराणीने ज्या ठिकाणी ही पार्टीकेली त्या ठिकाणामुळे ती चर्चेत आली आहे. या पार्टीतले अनेक फोटो माधुरीने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “Socially conscious dining, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सर्विससाठी कर्णबधीर मुलं आणि बेकर्स ऑटिस्ट हे ( मतिमंद )मुलं? ऐकूनही आश्चर्य वाटलं ना? आणि हे रेस्टॉरंट आहे तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन रॉड, पुणे येथे. ही संकल्पना आहे कॅन्सरवर काम करणाऱ्या एका तरुण आणि हरहुन्नरी डॉक्टर डॉ. सोनल कापसे हिची आणि तिला साथ देत तिथे खंबीरपणे उभा असतो तिचा नवरा शैलेश केदारे, असे मधुराणी म्हणाली. डॉ. सोनम कापसे यांनी समानतेच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. एक हेल्थकेअर innovation आणि research expert, शेतकरी आणि अपंग तरुणांना घेऊन “टेरासिन”ची संकल्पना सुरू केली,” असे मधुराणी म्हणाली.
आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video
पुढे तिच्या मुलीच्या वाढदिवसाविषयी बोलताना मधुराणी म्हणाली, “दरवर्षी स्वरालीचा वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी आमची इच्छा असते. यावर्षी स्वरालीला मित्र मैत्रिणींबरोबर cooking करायचं होतं, त्यामुळे तशी जागा शोधत असताना प्रमोदला हे रेस्टॉरंट सापडलं आणि मुलांनी एक वेगळं जग पाहिलं. त्यांनी कूकिंग केलं , गेम्स खेळले, sign language शिकले…. आणि हे सगळं प्रमोदच्या कल्पनेतून आणि डॉ. सोनल यांच्या मदतीने शक्य झालं.”
आणखी वाचा : “आम्हाला आता माहित झालं…”, अमिताभ यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर केली Cryptic पोस्ट?
पुढे या रेस्टॉरंटच्या काही विशेष गोष्टी मधुराणीने सांगितल्या आहेत, “इथल्या बेकरीमध्ये ऑटिस्ट मुलं काम करतात आणि आपल्याला ही लाजवतील अतिशय उत्तम बेकरी प्रोडक्ट बनवतात. इथली कर्णबधिर मुलं, मुली ही १००% अपंग आहेत. शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि ही माता त्यांची राहायची सुद्धा सोय स्वतः च्या जीवावर करते. इथे world cuisine म्हणजेच ( जागतिक पदार्थ ) मिळतात आणि इथल्या पदार्थांसाठी वापरले जाणारे सर्व जिन्नस थेट शेतातून येतात. पुण्याच्या जेवणात आरोग्य आणि चव वाढवण्यासाठी जागतिक पदार्थ बनवण्यासाठी तिने नाचणी, ज्वारी, कोडो, बारनयार्ड, राजगिरा यांसारखे स्थानिक वडिलोपार्जित धान्य घेण्याचे ठरवले. प्रिझर्व्हेटिव्ह, रंग आणि ऍडिटीव्ह नसलेले पदार्थ तुम्हाला इथे मिळतील.”
पुढे मधुराणी म्हणाली, “हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला. इतके वेगवेगळ्या डिशेस त्यांनी दिल्या आणि आम्ही सगळेच नेहमी पेक्षा खूप जास्त जेवलो पण तरीही कुठेही जडपणा, तडस लागणे हा अनुभव नाही. डॉ.सोनम कापसे यांचा विश्वास होता की दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे तर सन्माननीय व्यासपीठ आणि सुरक्षित भविष्य हवे म्हणून यांनी त्यांना महाराष्ट्रच्या जनतेसमोर आणण्याचे ठरवले. हे फक्त रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे.” तिच्या या निर्णयाचे कौतुक करत नेटकरी म्हणाले, “खूप सुंदर मधूराणी.”