गेल्या काही दिवसांपासून करोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने’चा सुत्रसंचालक राघव जुयालला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राघवने याची माहिती दिली आहे.
राघवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून ही माहिती दिली आहे. ‘ताप आणि खोकला आल्यानंतर, माझी करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कृपया काळजी घ्या आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करा, सुरक्षित रहा’, अशा आशयाची पोस्ट करत राघवने करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोचे लाखो चाहते आहेत. या शोमध्ये तुषार कालिया, माधुरी दीक्षित आणि धर्मेश येलांडे परिक्षक आहेत. तर राघव सुत्रसंचालक आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेशला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्याआधी ‘डान्स दीवाने’च्या सेटवर १८ लोकांना करोनाची लागण झाली होती.