बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबत सध्या तिने अनेक डान्स शोचे परिक्षक म्हणूनही काम केले आहे. माधुरी ही चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कायमच चर्चेत असते. नुकताच माधुरीचे पती श्रीराम नेने यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माधुरी आणि श्रीराम नेने हे सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. ते दोघे बऱ्याचवेळा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकताच माधुरी आणि श्रीराम नेने यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते दोघेही ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘तम्मा तम्मा अगेन’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral
माधुरी आणि श्रीराम नेने यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी श्रीराम नेने यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “डॉक्टर तुम्ही इतकी का पिता.” दुसरा नेटकरी म्हणाला, “डॉक्टर नेनेंचा मिथून दा डान्स.” तिसरा नेटकरी म्हणाला, “हे डॉक्टर कोणत्या क्षेत्रात आले.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “पप्पू कॅन डॅन्स साला.” दुसरा नेटकरी म्हणाला, “इंजेक्शन कहीं गलत जगह लग गया”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा विवाह १९९९ मध्ये झाला होता. श्रीराम हे व्यवसायाने डॉक्टर असून ते अमेरिकेत स्थायिक होते. लग्नानंतर माधुरीनेही अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली होती. ती अमेरिकेत राहू लागली होती. मात्र, आता फार वर्षानंतर माधुरी आणि श्रीराम आपल्या मुलांसह भारतात स्थायिक झाले आहेत. माधुरीने २००७ मध्ये ‘आजा नचले’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. यानंतर ती ‘गुलाब गँग’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकली.